Header AD

होम क्वारंटाईन रुग्णांना ३७२० रुपयांच्या गोळीचा भार पालिके कडून मोफत गोळी देण्यास नकार

 कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त असून, या रुग्णांवर पालिकेच्या कोविड सेंटर, विलगीकरण कक्ष, खाजगी हॉस्पिटल तसेच काही रुग्णांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत. होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना पालिकेकडून इतर गोळ्या मोफत देण्यात येत आहेत मात्र ३७२० रुपयांच्या फैबीफ्लू गोळीचा भार हा रूग्णांनाच सहन करावा लागत आहे. पालिकेच्या अशा धोरणामुळे गोरगरीब रुग्णांनी कसे उपचार घ्यायचे असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव प्रशांत माळी यांनी उपस्थित केला असून फैबीफ्लू हि गोळी रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना केस पेपर मधील क्र. २ ची फैबीफ्लू गोळी आयुक्तांच्या आदेशान्वये न देण्यास सांगितले आहे असे आरोग्य विभागातीलअधिकारी यांचे म्हणणे आहे. या एका गोळीचे पाकिट १२४० रुपयांचे असून ते एका रुग्णांसाठी एकूण तीन पाकिट लागतात. म्हणजेच या गोळीसाठी  एकूण ३७२० रुपये लागतात.


आधीच कोरोनाच्या महामारीमुळे अनेक लोकांचे रोजगार बंद आहेत व त्यामुळे आजारपणामध्ये पैसे आणायचे कोठूनहा भुर्दंड गोरगरीब नागरिकांसाठी का असा सवाल माळी यांनी उपस्थित करत सध्याची वस्तुस्थिती पाहता त्वरीत फेबीक्लू हि गोळी रुक्मिणीबाई रुग्णालय येथे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याबाबत माळी यांनी मुख्य आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील व आरोग्य विभागातील अधिकारी सरवणकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन दिले. त्या वेळेस या दोन्ही अधिकाऱ्यांनी  आयुक्त म्हणतील तर आम्ही होम क्वॉरंटाईन होत असलेल्या नागरिकांना ही फेबीक्लू गोळी देण्यांस सांगू असे उत्तर दिले.


 याबाबत प्रशांत माळी यांनी पालिका आयुक्तांना चार स्मरणपत्राद्वारे हि बाब पुन्हा लक्षात आणून दिली आहे. तरी देखील या महत्त्वाच्या विषयाकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पालिका क्षेत्रातील हजारो गरजवंत रुग्णांना या औषधापासून वंचित रहावे लागत आहे. तरी होम क्वॉरंटाईनरुग्णांना न परवडणाऱ्या फेबीक्लू गोळ्या उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव प्रशांत माळी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

होम क्वारंटाईन रुग्णांना ३७२० रुपयांच्या गोळीचा भार पालिके कडून मोफत गोळी देण्यास नकार होम क्वारंटाईन रुग्णांना ३७२० रुपयांच्या गोळीचा भार पालिके कडून मोफत गोळी देण्यास नकार Reviewed by News1 Marathi on May 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads