Header AD

जिवलग मित्र परिवारच्या वतीने डोंबिवली तील पोलिसांना आरोग्य सुरक्षा साधनांचे वाटप

 डोंबिवली (शंकर जाधव ) टाळेबंदीत लागू करण्यात आलेल्या नियमनावलीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीसांचे मनोबल बळकट व्हावे आणि आरोग्य सुरक्षित रहावे याकरिता डोंबिवली  एमआयडीसी  येथील जिवलग मित्र परिवाराच्या वतीने  कल्याण डोंबिवली येथील पोलीसांना आरोग्य   सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले.          डोंबिवली एमआयडीसी निवासी विभाग येथील जिवलग मित्र  परिवारच्या वतीने  कल्याण डोंबिवली भागात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून सार्वजनिक स्तरावर कोरोना संबधी अंमलबजावणी पार पाडण्याचे कर्तव्य आणि कर्तव्य निभावताना  झालेली कोरोनाचीलागण अशा दुहेरी आवाहनास पोलीस कर्मचारी तोंड देत आहेत.पोलीस कर्मचारी जिद्दीने या संकटाचा सामना करित आहेत.
        पोलीसांचे मनोबल बळकट व्हावे आणि आरोग्य सुरक्षित रहावे याकरिता डोंबिवली येथील जिवलग मित्र परिवाराच्या वतीने  कल्याण डोंबिवली येथील पोलीसांना सुरक्षा आरोग्य साधनांचे वाटप करण्यात आले.डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाणे येथील १८० पोलीस अधिकारी-  कर्मचारी यांना आणि कल्याण डोंबिवली भागातील विविध ठिकाणच्या ८०शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना  सँनिटायझर,हँडवाँश आणि मास्कचे  जिवलग मित्र परिवारच्या वतीने वाटप  करण्यात आले.
       कोळसे वाडी वाहतूक विभाग अंतर्गत टाटा नाकादूध नाका येथील वातूक पोलीस कर्मचाऱ्यांना देखील साधनांचे वाटप जिवलगच्या कार्यकर्त्यांनी केले.गेल्या वर्षी कोरोना काळात गरिब गरजुना अन्नदान करण्यात आले होते.पुढील काळात गरजूना  आँक्सीजन सिलिंडर वाटप करण्यात येईल आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत असल्याचे जिवलगच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

जिवलग मित्र परिवारच्या वतीने डोंबिवली तील पोलिसांना आरोग्य सुरक्षा साधनांचे वाटप जिवलग मित्र परिवारच्या वतीने डोंबिवली तील पोलिसांना आरोग्य सुरक्षा साधनांचे वाटप Reviewed by News1 Marathi on May 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads