Header AD

केंद्र सरकारच्या भाववाढ विरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अ प्रभागाच्या वतीने मोहोने येथे केंद्र सरकार विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व खते यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे सर्वं सामान्य नागरिक  व शेतकरी यांचे  कंबरडे  मोडले  आहे. कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकार आर्थिक शोषण करीत  आहे. ही भाव वाढ कमी करा, शेतकऱ्यांना सवलतीच्या  दरात  बी बियाणे व खते  द्या या मागणीसाठी  आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात माजी नगरसेवक जे. सी. कटारिया, पारसनाथ  तिवारी, अ प्रभाग  अध्यक्ष गणेश  कोणकर, जिल्हा उपाध्यक्ष विनायक काळण, रामदास वळसे पाटील, मोरेश्वर तरे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हा पक्ष सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, दुर्बल घटक यांचे  हित जपणारा पक्ष आहे. त्यांच्या हिताची  जपणूक  करणे व न्याय मिळवून देण्यासाठी आज सनदशिर मार्गाने आंदोलन करीत आहोत पण  गरज  पडल्यास रस्त्यावर उतरून जन आंदोलन करू असा इशारा यावेळी माजी नगरसेवक जे. सी. कटारिया यांनी दिला. 

केंद्र सरकारच्या भाववाढ विरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन केंद्र सरकारच्या भाववाढ विरोधात  राष्ट्रवादीचे  निषेध आंदोलन Reviewed by News1 Marathi on May 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads