Header AD

निराधांरांच्या जेवणासाठी तरुणाईचा पुढाकार फ्रेंड्स युनिटी फाउंडेशनच्या वतीने निरंतर अन्नदान

 कल्याण , कुणाल म्हात्रे  : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला असून यामुळे अनेकांचे रोजगार बंद झाले असून, अनेक निराधारांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. अशा या निराधारांच्या मदतीसाठी तरुणाईने पुढाकार घेतला असून फ्रेंड्स युनिटी फाउंडेशनच्या वतीने ५ मे पासून निरंतर अन्नदान सुरु आहे.


कोरोना काळात अनेकांचे रोजगार ठप्प पडलेतअनेकांना दोन वेळचं पोट भरण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा गरजू बांधव-मायमाऊलींना अन्नापासून वंचित न राहू देण्याच्या हेतूने फ्रेंड्स युनिटी फाउंडेशनच्या वतीने दररोज दोन वेळेचं जेवण देण्याचा संकल्प केला असून ५ मे पासून या उपक्रमास सुरुवात झाली आहे. या उपक्रमात आदिवासी पाडा कोनगाव, बकरा मंडी कोनगाव, डम्पिंग ग्राउंड कल्याण, लाल चौकी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रोड, गुरुदेव हॉटेल स्टेशन रोड, दिपक हॉटेल आदी परिसरातील निराधारांना रोज जेवण दिले जात आहे.


सामाजिक जबाबदारी समजून निःस्वार्थ भावनेने काम करण्यासाठी तरुणाई एकवटली असून सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी या उपक्रमाला स्वेच्छेने कोणाला मदत करायची असल्यास संस्थेशी संपर्क करण्याचे आवाहन फ्रेंड्स युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष अनिकेत म्हात्रे आणि ओमकार कोळी यांनी केले आहे. 

निराधांरांच्या जेवणासाठी तरुणाईचा पुढाकार फ्रेंड्स युनिटी फाउंडेशनच्या वतीने निरंतर अन्नदान निराधांरांच्या जेवणासाठी तरुणाईचा पुढाकार फ्रेंड्स युनिटी फाउंडेशनच्या वतीने निरंतर अन्नदान Reviewed by News1 Marathi on May 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads