Header AD

कोवीड रूग्णांना मोफत रुग्णवाहिका सुविधा द्या – अजय सावंत

 कल्याण , कुणाल म्हात्रे : सध्या कोरोना काळात रुग्णवाहिकाचालकांकडून रुग्णांची मोठ्या प्रमाणात लुट सुरु असून या महामारीच्या काळात रुग्णांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोविड रुग्णांना मोफत रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते अजय सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


कल्याण डोंबिवलीत असणाऱ्या खासगी रुग्णवाहिका चालक सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा दराने भाडे आकारात अक्षरशः लुबाडणूक करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व रुग्णवाहिका आपल्या ताब्यात घेऊन सामान्य नागरिकांना त्या मोफत उपलब्ध करून द्याव्यात असे सावंत यांनी सांगितले.  सध्या सुरू असणाऱ्या लसीकरण मोहीमेसाठी ऑनलाईन पूर्वनोंदणीची अट असून स्मार्टफोन नसणाऱ्या समाजातील वंचित लोकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी देखील सावंत यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत यासह विविध मागण्या केल्या आहेत.


त्याचबरोबर केडीएमसीच्या आर्ट गॅलरी कोवीड सेंटरमध्ये कोवीडचा कमी प्रमाणात संसर्ग झाला असतानाही रुग्णांचा मृत्यू होत असल्याबाबत सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात प्रश्न उपस्थित केले आहेत. इथल्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे इतर रुग्णांच्या नातेवाईकांनाही कोरोना लागण झाल्याचे सांगत डॉ. अमित गर्ग आणि डॉ. आलम यांच्या मनमानीमूळे हे कोवीड रुग्णालय मृत्यूचे केंद्र बनल्याचा धक्कादायक आरोपही सावंत यांनी आपल्या पत्रात केला आहे. राज्य शासनाने या सर्व प्रश्नांवर तातडीने उपाय योजना करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोवीड रूग्णांना मोफत रुग्णवाहिका सुविधा द्या – अजय सावंत कोवीड रूग्णांना मोफत रुग्णवाहिका सुविधा द्या – अजय सावंत Reviewed by News1 Marathi on May 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads