Header AD

टिटवाळ्यात सिध्दी विनायक मंदिर ट्रस्टतर्फे कोविड सेंटर उभारण्याची मागणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कोरोना उद्रेकाने कोरोना रूग्णाची वाढती संख्या पाहता अपुरी रुग्णालयातील बेड संख्यांमुळे रूग्णालयात बेड  मिळण्यासाठी रूग्ण़ाच्या नातेवाईकांची वणवण आशा कठीण प्रसंगात लाँकडाँऊन मुळे देऊळे बंद झाली तरी काही देवस्थानानी पुढाकार घेत रुग्णालय सुरू करून दिलासा देत रुग्णसेवा सुरू केल्या. याच धर्तीवर  टिटवाळा सिध्दीविनायक ट्रस्टतर्फे किमान २०० बेडचे निशुल्क सेवा देणारे तात्पुरत्या स्वरूपातील हॉस्पिटलची उभारणी करावी अशी मागणी टिटवाळा एज्युकेशनल् कल्याणकारी फाँऊडेशन चे संस्थापक अध्यक्ष विजय देशेकर यांनी टिटवाळा सिध्दीविनायक ट्रस्ट यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.


 सुमारे एक वर्षाहून जास्त काळ झाला कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने फैलावत असुन सद्यस्थितीत मोठ्याप्रमाणावर नागरीकांना कोरोनाची लागण होत असुन बहुतांश ठिकाणी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाही, त्यामुळे सध्याची नागरीकांची हलाखीची परीस्थिती लक्षात घेता पंढरपूर शिर्डी, तुळजापूर, अक्कलकोट, शेगाव आदी तिर्थक्षेत्रांच्या विश्वस्तमंडळांनी कोविड हॉस्पिटल उभारले आहेतत्या धर्तीवर सिध्दीविनायक ट्रस्टतर्फे किमान २०० बेडचे निशुल्क सेवा देणारे तात्पुरत्या स्वरूपातील हॉस्पिटलची उभारणी करावी त्यासाठी आपल्या संस्थेचे मंगल कार्यालय परीसर खूपच चांगले ठिकाण असुन येथील शांत वातावरणात हॉस्पिटल सुरु केल्यास रुग्णांना लवकर आराम पडु शकतो.


 श्री क्षेत्र टिटवाळा येथील महागणपतीचे पावन क्षेत्र असुन येथील नागरीकांना व गणेशभक्तांना संस्थेच्या दातृत्वगुणाची नेहमीच प्रचिती आली असुन याच्या अनुषंगाने येथील नागरिकांना आज आपल्या सिध्दीविनायक ट्रस्ट टिटवाळा तर्फे या हॉस्पिटल सुविधेची देखील अपेक्षा आहे. लवकरात लवकर हॉस्पिटलची उभारणी करण्यात पुढाकार घ्यावा, हे हॉस्पिटल उभारणीसाठी टिटवाळा रहिवासी निश्चितच आर्थिक हातभार लावू याची ग्वाही देत असल्याचे विजय देशेकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.


टिटवाळ्यात सिध्दी विनायक मंदिर ट्रस्टतर्फे कोविड सेंटर उभारण्याची मागणी टिटवाळ्यात सिध्दी विनायक मंदिर ट्रस्टतर्फे कोविड सेंटर उभारण्याची मागणी Reviewed by News1 Marathi on May 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads