Header AD

किरीट सोमय्यांचे कल्याण मध्ये रक्तदान

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  रक्तदान व प्लाझ्मा दान करणे हि काळाची गरज असून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्त व प्लाझ्मा दान करून जीवनदान दयावे  असे आवाहन  माजी खासदार किरट सोमय्या यांनी केले. कल्याण येथील  स्वामी नारायण हॉल येथे कोरोना समुपदेशन समितीच्या विदयमाने आयोजित  रक्तदान व प्लाझ्मा दान नोंदणी शिबिरात किरिट सोमय्या बोलत होते.  यावेळी सोमय्या यांनी स्वतः देखील  रक्तदान केले.


यावेळी  माजी आमदार नरेंद्र पवार,  समितीचे अध्यक्ष अनिल काकडेज्येष्ठ  सामाजिक कार्यकर्ते सचिन ताम्हणकरएकनाथ जाधवधनंजय तायडेप्रथमेश पुण्यार्थी,  नयना नायर,  जयश्री सातपुते,  करूणा कातखडेभारती वाढेसीमा सुरळकर आदीजण उपस्थित होते.

 

कोरोना समुपदेशन समितीचे अध्यक्ष अनिल काकडे यांच्या विरोधात केलेल्या पोलिस तक्रारीबाबत किरिट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त करत यापुढे असा प्रकार घडल्यास आम्ही लक्ष घालू असे आश्वासन दिले. तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कोरोना समुपदेशन समितीच्या पुढिल कार्यास  शुभेच्छा देत  कोरोना समुपदेशन समिती गेले  वर्षभर करत असलेले  काम  निश्चितच कौतुकास्पद  असल्याचे स्पष्ट केले.


किरीट सोमय्यांचे कल्याण मध्ये रक्तदान किरीट सोमय्यांचे कल्याण मध्ये रक्तदान Reviewed by News1 Marathi on May 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads