Header AD

आरएसपीच्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी युवा मोर्चा चीगारपीट ग्रस्तांना मदत
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आरएसपीच्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी युवा मोर्चाने मुरबाड तालुक्यातील गारपीट ग्रस्तांना मदत केली आहे.  


मुरबाड तालुक्यातील आदिवासी गावात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने घरांची पत्रे कौल व संसाराचे मोठे नुकसान झाले होते. न्याहर्डीमेर्दीआल्याचीवाडीमोधळवाडीकेळेवाडी,वाल्हीवरे,धारखिंड,बांडेशेत या आदिवासी गावात नुकसानग्रस्तांनाराष्ट्रीय ओबीसी मोर्चा यांच्या आदिवासी वनवासी मदत योजनेअंतर्गत प्रभारी रक्षंदा सोनवणे यांच्या सहयोगाने तसेच कल्याण-डोंबिवली मॅन्युफॅक्चर्स असोशियन आणि  जेजस इज लाइफ फौंडेशन यांच्या सौजन्याने आरएसपी अधिकारी युनिटचे कमांडर मणिलाल शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० आदिवासी गरजू लोकांना १८ ते २० किलो वजनाचे रेशन कीटपीठतूर डाळतांदूळतेल साखर पोहे साबण कोकोनट ऑइल मीठ अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले.


राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, कामा असोसिएशनजेजस लाईफ फाउंडेशन,  स्वामी नारायणचे दिनेश ठक्करयांच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळे आरएसपी युनिटला  महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात मदत पोचविणे शक्य होत आहे. या सर्व दानशूर दात्यांचे शिंपी यांनी आभार मानले. राष्ट्रीय ओबीसी प्रभारी सदस्य रक्षंदा सोनवणे यांनी आदिवासी वनवाशी विकास योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वीस ते बावीस जिल्ह्यात आपले स्तुत्य असे उपक्रम हाती घेऊन खऱ्या अर्थाने रणरागिणी हिरकणीची जाणीव महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला करून दिली आहे.

        
                   रक्षंदा सोनवणे यांनी आरएसपी अधिकारी युनिटचेकामाअसोसिएशनजेजस इज लाइफ ट्रस्टस्वामी नारायण हॉलत्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन केले आणि मेर्दीआल्याची वाडीमोधळवाडी येथील जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच यांना आश्वासन दिले,की यापुढे आमची या परिसरात मदत राहील. जीजस लाइफ फाऊंडेशनचे चेअरमन मुकेश ग्वालानी यांनी हा परिसर पाहून आरएसपी अधिकारी युनिट मुळे आम्हाला आज खऱ्या गरजू लोकांपर्यंत मदत पोचवता आली या शब्दात कौतुक केले. 

आरएसपीच्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी युवा मोर्चा चीगारपीट ग्रस्तांना मदत आरएसपीच्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी युवा मोर्चा चीगारपीट ग्रस्तांना मदत Reviewed by News1 Marathi on May 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads