Header AD

उंबर्डे येथील रस्ता रुंदीकरणातील ७० बांधकामे निष्कासित केडीएमसीची धडक कारवाई




कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण पश्चिमेतील कै. आत्माराम भोईर चौक (तलाठीऑफिस) ते नेटक-या चौक उंबर्डे पर्यत २४ मी, १८ मी व १५ मी रूंद अशा रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी सुमारे ७० बांधकामे निष्कासनाची धडक  कारवाई  शनिवारी करण्यात आली.


हि कारवाई महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखालीब प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप, क प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडदे,  अ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत, उप अभियंता भालचंद्र नेमाडे व कनिष्ठ अभियंता अनिल वांगसकरप्रकाश मोरे यांनी संयुक्तपणे तसेच अ,ब क प्रभागातील ३० कर्मचारी,  महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे १२ पोलीस कर्मचारी व खडकपाडा पोलीस स्टेशनचे २ पोलीस अधिकारी व २० पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि ३ जेसीबी व डंपर यांचा वापर करून करण्यात आली.

          

           या रस्त्यामधील ११ घरे४ धाबे,  ४५ दुकाने, ५ कंपाऊंड वॉल, ४ भंगार दुकाने, १ सर्विस सेंटर अशी सुमारे ७० बांधकामे कारवाईत निष्कासीत करण्यात आली.

उंबर्डे येथील रस्ता रुंदीकरणातील ७० बांधकामे निष्कासित केडीएमसीची धडक कारवाई उंबर्डे येथील रस्ता रुंदीकरणातील ७० बांधकामे निष्कासित केडीएमसीची धडक कारवाई Reviewed by News1 Marathi on May 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads