Header AD

महापालिका आयुक्तांची ठाणे ग्लोबलला भेटमृत्यू दर कमी करण्या बरोबरच तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने घेतला आढावा....


महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आज ठाणे ग्लोबल हॅास्पीटलला भेट दिली. सोबत अतिरिक्त आयुक्त(1) गणेश देशमुख आणि इतर अधिकारी.


ठाणे ,  प्रतिनिधी  ;   महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आज ठाणे ग्लोबल हॅास्पिटलला भेट देवून तेथील मृत्यू दर कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करायवायाच्या उपाययोजना आणि आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने पावले उपलण्याचे आदेश दिले.


            कोविड बाधित रूग्णांचा मृत्यू दर कमी करण्याबाबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी आज सकाळी ठाणे ग्वोबल हॅास्पीटलला भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (1) गणेश देशमुख, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, विश्वनाथ केळकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, ग्लोबल हॅास्पीटलचे वैद्यकीय अधीक्षक डॅा. अनिरूद्ध माळगावकर आदी अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी महापालिका आयुक्तांनी ग्लोबल हॅास्पीटलमधील मृत्यू दर कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. आयसीयू कक्षामध्ये तज्ज्ञ डॅाक्टरांची आवश्यकता असल्यास ते तातडीने नेमण्याच्या सूचना त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिल्या. तसेच आयसीयूमध्ये आणि व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रूग्णांची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर औषधांची उपलब्धता, ॲाक्सीजनचा पुरवठा याचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.


            दरम्यान, कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लहान मुलांसाठी 100 खाटांचा स्वतंत्र कक्ष निर्माण करणे, तज्ज्ञ डॅाक्टर्स, आवश्यक असलेल्या औषधांची खरेदी करणे, ॲाक्सीजनचा पुरवठा आदींची तयारी करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.

महापालिका आयुक्तांची ठाणे ग्लोबलला भेटमृत्यू दर कमी करण्या बरोबरच तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने घेतला आढावा.... महापालिका आयुक्तांची ठाणे ग्लोबलला भेटमृत्यू दर कमी करण्या बरोबरच तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने घेतला आढावा.... Reviewed by News1 Marathi on May 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads