Header AD

शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाडांची विद्यार्थ्यांना मदत

   



डोंबिवली ( शंकर जाधव ) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद होता काम नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु आहे. मात्र अश्या बिकट परिस्थिती शिक्षण सुरु असले तरी काही गरीब विद्यार्थ्यांना शाळेची फी भरता आली नाही.



           अश्या विद्यार्थ्यासाठी शिवसेना त्यांच्या मदतीला उभी असल्याचे दिसले. कल्याण ( पूर्व ) नूतन ज्ञानमंदिर शाळेतील काही शिक्षकांनी शाळेतील परिस्थिती बिकट असल्याने फी भरू शकत नाही अशी व्यथा शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे मांडली. शाळेतील अश्या विद्यार्थ्यांसाठी आपण काही मदत करावी अशी विनंती शिक्षकांनी गायकवाड यांच्याकडे केली. 



               माजी नगरसेवकांनी सामाजिक बांधलकी म्हणून शाळेतील मुख्याधाकां कडे २५ हजार रुपयांचा धनादेश मदत सुपूर्त केला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली ठाकूरकलाकार-बजरंग बादशहाशाळेचे माजी विदयार्थी प्रशांत बोटेजेष्ठ शिवसैनिक सुरेश रसाळ व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाडांची विद्यार्थ्यांना मदत शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाडांची  विद्यार्थ्यांना मदत Reviewed by News1 Marathi on May 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads