Header AD

अन्नदा व परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने अन्नन धान्य वाटप
उस्मानाबाद, दि.२४ ; -  मुंबईतील अन्नदा संस्था व उस्मानाबाद, तुळजापूर येथील नळदुर्ग भागातील परिवर्तन सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नळदुर्ग शहरातील विधवा, निराधार ,परित्यक्ता ,एकल महिला, गोरगरीब ,गरजू अशा एकूण  २७२ कुटुंबाला अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. 
             राज्यात कोरोनामुळे लॉक डाउन असल्याने अनेकांच्या रोजगारावर  परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील अन्नदा संस्था व तुळजापूर नळदुर्ग भागातील परिवर्तन सामाजिक संस्था यांनी नळदुर्ग शहरातील विधवा, निराधार ,परित्यक्ता ,एकल महिला तसेच गोरगरीब ,गरजू अशा २७२ कुटुंबाला अन्नधान्य किटचे वाटप केले. 
            यावेळी नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड , नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि जगदिश राऊत, उपनिरीक्षक के.एम.लहाने, परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव मारुती बनसोडे यांच्या हस्ते या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी सैनिक मधुकर लोखंडे ,पप्पू सुरवसे (सम्राट ग्रुप ) उमेश गायकवाड (D B N) प्रमोद लोंढे ,बशीर शेख आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

अन्नदा व परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने अन्नन धान्य वाटप अन्नदा व परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने अन्नन धान्य वाटप Reviewed by News1 Marathi on May 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads