Header AD

ब्रह्मांड संगीत कट्टयावर रंगला सप्तसुरांचा पारिवारीक सोहळा!ठाणे, प्रतिनिधी  ;  कोरोना महामारीच्या काळात माणसे एकमेकांपासुन दुरावली असली तरी सौ. नीलम भोगटे व श्री. प्रकाश काणेकर या कलासक्त भाऊ बहिणीच्या जोडीने सर्व परिवाराला ऑनलाईन माध्यमाद्वारे एकत्र आणुन *'सप्तसुर सप्तरंग'* हा दर्जेदार सुमधुर गीतांचा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस आणला. 


सनईच्या मंगलस्वरांनी या पारिवारीक संगीत सोहळ्याचा श्रीगणेशा झाला. विद्या यांच्या 'वक्रतुण्ड महाकाय' या प्रार्थनेने वातावरण प्रसन्न केले. रुपाली यांनी 'रोज रोज आंखो तले' या गीतातील गोडवा व 'मेरे ख्वाबों मे' या गीततील चैतन्य चपखलपणे मांडले. या कार्यक्रमाला स्वरांचे कोंदण चढवले ते प्रकाश यांनी. 'दयाघना' या गीतातुन प्रकाश यांच्या आवाजातील  प्रासादिकता व चतुरस्त्रपणा याचे श्रवणीय दर्शन रसिकांना झाले. श्रद्धा यांनी सुंदर अदाकारीत ' भंवरा बडा नादान' हे गीत सादर केले. 


मंगला यांच्या 'मुझसे इस रात की' व 'तिन्ही सांजा' या गाण्यांमधील आर्तता रसिकांच्या मनास भिडली. विंदा यांनी 'अधीर मन झाले' हे रोमांचक गीत सुंदररित्या सादर केले. 'धुंद मधुमती' हे कर्णमधुर गीत सुचित्रा यांनी सादर केले. रसिकांच्या ह्रदयाला हात घालणारे 'इक दिन बिक जाएगा' व 'कुछ ना कहो' ही गीते पराग यांनी उत्तम नजा़कतीमध्ये सादर केली. तरुणाईलाही वेड लावेल अशा लाडिक   अंदाजात 'जाने क्या तुने कही' व 'ढूंढो ढूंढो रे साजना' अशी सुमधुर साद घालत नीलम यांनी रसिकांच्या मनावर जादू केली. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य किशोर यांनी 'शाम ए ग़म' हे गीत गाऊन माहोल भावपूर्ण केला. 


यानंतर  प्रकाश व निता यांचे ' बागों मे बहार आयी' , रुपाली व कृत्तिका यांचे ' मन सात समुंदर' या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. 'चलते चलते' या गीताने किशोर यांनी कार्यक्रमाची सुरेल व भावूक सांगता केली. कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी मनिषा पत्की यांनी उत्तमरित्या सांभाळली. ओघवत्या भाषेतील त्यांचे निवेदन तितकेच माहितीपर देखील होते. पडद्यामागचे कलाकार उदय पत्की याचे मार्गदर्शन व उत्तम संकलन यामुळे कार्यक्रम केवळ श्रवणीय नव्हे तर रमणीय देखील झाला.


आज कोरोनाने सर्वांना बेड्या घालून एकमेकांपासुन दूर केले असले तरी सर्वांना एकत्र आणण्याची जादूई ताकद संगीतामध्ये आहे हेच जणू या संगीतप्रेमी कुटुंबाने दाखवून दिले व आजच्या काहिश्या निरस वातावरणात एक सकारात्मक अनुभूति रसिकांना दिली.

ब्रह्मांड संगीत कट्टयावर रंगला सप्तसुरांचा पारिवारीक सोहळा! ब्रह्मांड संगीत कट्टयावर रंगला सप्तसुरांचा पारिवारीक सोहळा! Reviewed by News1 Marathi on May 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads