Header AD

१८लाखाची खाजगी बस लंपास करणारी चौकडी गजा आड ..
भिवंडी दि 2 (प्रतिनिधी ) एका  ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची १८ लाखांची खाजगी बस पळून नेणाऱ्या चार जणांच्या टोळीला कोनगाव पोलिसांनी सापळा रचून  गजाआड केले आहे. या चोरट्यांकडून बसही हस्तगत करण्यात आली आहे. रमीज गुलाम सैय्यद वय-२६, रा.  रा. पडघा- बोरीवली, ता. भिवंडी) आलीम नागोमियाँ अन्सारी (वय-३४,  रा.  मानकोली, ता. भिवंडी) मोजिम हुसैनमियाँ अन्सारी (वय-४६, रा. मानकोली, ता. भिवंडी) रूस्तम नूरमोहम्मद अन्सारी (वय-३९ , रा.  मानकोली, ता. भिवंडी) असे बस लंपास करणाऱ्या चोरट्यांची नावे आहे. विशेष म्हणजे चारही आरोपी मूळचे झारखंड राज्यातील असून ते एका चाळीच्या खोलीत भाड्याने राहत होते. 

 

  ■जीपीएसमुळे चोरट्यांसह बसचा लागला सुगावा ..   


ठाण्याच्या माजिवडा परिसरात  राजेश शुरप्पा पुजारी ( वय- ५४) हे राहतात . त्यांचा  कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुजारी  नावाने ट्रान्सपोर्टचे कार्यलय आहे. काल मध्यरात्री १ वाजल्याच्या सुमारास त्यांची बस चोरटयांनी पळवली होती. त्यानंतर त्यांनी बस चोरीची तक्रार कोनगाव पोलीस ठाण्यात नोंद केली करून पोलिसांनी तपास सुरु केला. विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या बसमध्ये  जीपीएस टॅक यंत्रणा लावल्याचे पोलीस पथकाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ही  बस ही नारपोली पोलिस ठाणे हद्दीत मानकोली परिसरात फिरत असल्याचे  बसमध्ये लावलेल्या जीपीएस टॅक यंत्रणामध्ये तपास अधिकारी जीवन शेरखाने यांना दिसून आले. 

 

■माणकोली परिसरात पोलिसांनी रचला सापळा ..  

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शेरखाने, पोना. मासरे, पोशि.  कृष्णा महाले, गणेश चोरगे, यांनी नारपोली पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक चौधरी यांच्या  मदतीने माणकोली परिसरात सापळा रचून पोलीस पथकाने  बसचा शोध घेवुन बस चोरी करणारे चारही आरोपी अटक केले. आता पोलीस या चोरटयांनी आणखी काही वाहने लंपासकेली का याची चौकशी करीत आहेत. या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक  जिवन शेरखाने  करीत आहेत.

१८लाखाची खाजगी बस लंपास करणारी चौकडी गजा आड .. १८लाखाची खाजगी बस लंपास करणारी चौकडी गजा आड .. Reviewed by News1 Marathi on May 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads