Header AD

भिवंडी मनपाच्या कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये बेड आरक्षित करण्याची मागणी
भिवंडी  दि. १४(प्रतिनिधी  ) सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून मागील वर्षी पहिल्या लाटेत अनेक कामगार कर्मचारी आवश्यक त्या औषधोपचारापासून वंचित राहिल्यामुळे मयत झालेले आहेत पुन्हा अशी वेळ येऊ नये म्हणून भिवंडी मनपाच्या कामगार कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन, व औषधोपचार आरक्षित करून ठेवण्याची मागणी लेबर फ्रंट या कामगार संघटनेचे अध्यक्ष ऍड किरण चन्ने व सरचिटणीस संतोष चव्हाण यांनी मनपा आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 


              सध्या रुग्णासंख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल मिळणे कठीण झाले आहे. त्यातच सर्वच हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक बेड, ऑक्सिजन आणि आवश्यक ती इंजेक्शन मिळविण्यामध्ये हवालदील झालेले आहेत, भिवंडी महानगरपालिका कामगार कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून आपले शहर कसे सुरक्षित राहील याकामीच कोणत्याही प्रकारची रोगप्रतिबंधक सामुग्री नसतानासुद्धा काम करत आहेत..                 त्यामुळे त्यांना भविष्यात लागण होण्याची शक्यता लेबर फ्रंटने वर्तविली असून भिवंडी मनपाच्या कामगार कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये बेड, ऑक्सिजन, व औषधोपचार आरक्षित करून ठेवलेच तर ते लवकर बरे होण्यास मदत होईल त्यामुळे कामगारांसाठी कोविड सेंटर मध्ये बेड व इतर सुविधा आरक्षित करावी अशी मागणी लेबर फ्रंट युनियनचे अध्यक्ष ऍड किरण चन्ने व सरचिटणीस संतोष चव्हाण यांनी केली आहे. 
भिवंडी मनपाच्या कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये बेड आरक्षित करण्याची मागणी भिवंडी मनपाच्या कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये बेड आरक्षित करण्याची मागणी Reviewed by News1 Marathi on May 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads