Header AD

अ.भा.वि.प.च्या वतीने रक्तदान शिबीर




कल्याण , कुणाल म्हात्रे  : 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकल्याण शहर,  स्व. अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती आणि हेल्पिंग हॅण्ड्सयांच्या वतीनेओक हायस्कूल कल्याण येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणानंतर उद्भवणारा रक्ताचा तुटवडा टाळण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ.संदीप निंबाळकर (आरोग्य अधिकारी,केडीएमसी), देवदत्त जोशी (अभाविप पश्चिम क्षेत्रिय संघटन मंत्री)कविता वालावलकर (अभाविप पुर्व कार्यकर्ता आणि कै. वामनराव ओक रक्तपेढीसचिव) आणि अमोल शिंदे (कल्याण शहर मंत्रीअभाविप) यांच्या हस्ते झाले.


कै. वामनराव ओक रक्तपेढीठाणे यांच्या देखरेखीखाली झालेल्या या रक्तदान शिबिरात ४१ जणांची नोंदणी झाली त्यापैकी ३५ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे २० जणांनी पहिल्यांदाच रक्तदान केले होते.


अ.भा.वि.प.च्या वतीने रक्तदान शिबीर अ.भा.वि.प.च्या वतीने रक्तदान शिबीर Reviewed by News1 Marathi on May 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads