Header AD

पोलीसांचे आत्मबळ वाढविण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांकडे कोव्हिट सेंटरची मागणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : ठाणे शहर पोलिसां करिता व त्यांचे कुटुंबियाकरिता एक स्वतंत्र अद्ययावत कोव्हिड सेंटर उभारणे बाबत कल्याणातील मानव साहाय्य सेवा संस्थेने पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे.


ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी हे गेले वर्षभर कोरोना काळात रस्त्यावर उभे राहून, गर्दीत शिरून कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत व त्यामुळे अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा देखील झाली आहे. दुर्दैवाने त्यांना वेळेत चांगले उपचार न मिळाल्याने त्यात काही पोलिस शहीद देखील झाले आहेत. ही बाब अत्यंत दुःख दायक आहे. पोलिसांबरोबर त्यांच्या कुटुंबियांनाही लागण होऊन हा त्रास भोगावा लागलेला आहे.


   आत्ता कोरोनची दुसरी  लाट आली आहे. या लाटेने सर्व जगाला भयभीत केले आहेत्याही परिस्थितीत पोलीस बांधव जिवाची पर्वा न करता कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून रस्त्यावर उतरून काम करीत आहेत तसेच पोलीस ठाण्यात रोजची कामे करताना  त्यांचा कळत न कळत कोरोना पोझिटिव व्यक्तीशी संपर्क येऊन पोलीस पोझिटीव येण्याचे दिवसेंदिवस प्रमाण वाढलेले आहे. सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध कोव्हिड सेंटरमध्ये सामान्य नागरिकांना जागा मिळत नाहीच नाही परंतु पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा जागा मिळत नाही त्यामुळे पोलिस कर्मचारी, अधिकारी ड्युटी करताना भीतीचे वातावरणात ड्युटी करत असल्याचे दिसून येत आहेत.


यामुळे पोलिसांकरिता व त्यांच्या कुटुंबीयाकरिता एक स्वतंत्र अद्ययावत कोवीड सेंटर ठाणे शहर पोलिस विभाग तर्फे  सुरू करणे नितांत गरजेचे आहे. त्यामुळे चुकून लागण झालीच तर पोलिसांच्या कुटुंबियांना निश्चिंतपणे बेड उपलब्ध होऊ शकेल व चांगला औषधउपचार ही मिळू शकेल ही आत्मविश्वासाची भावना  सर्व पोलिसांच्या मनात निर्माण होण्याची गरज असल्याची मागणी मानव सहाय्यक सेवा मंडळाचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड व सचिव अमर काझी  यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


पोलीसांचे आत्मबळ वाढविण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांकडे कोव्हिट सेंटरची मागणी पोलीसांचे आत्मबळ वाढविण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांकडे कोव्हिट सेंटरची मागणी Reviewed by News1 Marathi on May 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads