Header AD

क्रॉम्‍प्‍टनतर्फे प्रगत आयओटी - सक्षम सायलण्‍टप्रो स्‍मार्ट सिलिंग पंखे सादर उच्‍च दर्जाच्‍या एअर कम्‍फर्टसह दुप्‍पट शांत कार्य आणि जवळपास ५० टक्‍क्‍यांची वीज बचत

 


मुंबई, -२० मे २०२१ :  ७५ वर्षांहून अधिक काळाचा ब्रॅण्‍ड वारसा आणि विश्‍वास, दर्जा व टिकाऊपणासाठी ओळखल्‍या जाणा-या क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍हस कन्‍झ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि. या भारताच्‍या सिलिंग पंखा विभागातील बाजारपेठ अग्रणी कंपनीने आयओटी-सक्षम सायलण्‍टप्रो स्‍मार्ट सिलिंग पंख्‍यांची नवीन प्रगत श्रेणी सादर करत नवोन्‍मेष्‍काराचा दर्जा नव्‍या उंचीवर नेला आहे. वाढत असलेल्‍या गोंगाटाच्या जीवनशैलीमध्‍ये शांतचित्त क्षणांचा अनुभव देण्‍याचा मनसुबा असलेल्‍या या नवीन ऐरोडायनॅमिक डिझाइनमध्‍ये अॅक्टिव्‍ह बीएलडीसी तंत्रज्ञान आहे, ज्‍यामधून दुप्‍पट शांत कार्य आणि जवळपास ५० टक्‍के वीज बचतीची खात्री मिळते. 


नॅच्‍युरल ब्रीझ मोड: नैसर्गिक थंडावा निर्माण करण्‍यासाठी पंखा स्‍पीड ३ वरून स्‍पीड ५ वर जाईल आणि दर ३० सेकंदांनी स्‍पीड ३ वर येईल. ज्‍यामधून थंड व उत्तम वातावरणाच्‍या निर्मितीची खात्री मिळेल. हा मोड स्‍मार्ट होम गॅझेट्सच्‍या माध्‍यमातून नियंत्रित करता येऊ शकतो.  


क्रॉम्‍प्‍टनने सादर केलेल्‍या सर्वात प्रिमिअम पंख्‍यांपैकी एक असलेला सायलण्‍टप्रो स्‍मार्ट पंखा सिल्‍क व्‍हाइट व ऑल व्‍हाइट अशा आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असून किंमत ६२०० रूपये ते ६८०० रूपयांपर्यंत आहे.


कंपनीच्‍या नवीन श्रेणीबाबत सांगताना क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍हस कन्‍झ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि.चे उपाध्‍यक्ष श्री. रंगाराजन श्रीराम म्‍हणाले, ''आजच्‍या घरांसाठी थंड व आरामदायी हवा देणारे स्‍मार्ट पंखे काळाची गरज बनले आहेत. आजच्‍या काळात पंख्‍यांमधून येणारा आवाज पाहता शांतचित्त पंख्‍यांची गरज लक्‍झरी बनली आहे. तसेच न्‍यू नॉर्मलमध्‍ये घरामध्‍येच अधिक वेळ राहण्‍यासोबत उन्‍हाळ्यातील उकाडा वाढत असताना लोक त्‍यांच्‍या वीज बचतींबाबत खूपच दक्ष राहण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. 

क्रॉम्‍प्‍टनतर्फे प्रगत आयओटी - सक्षम सायलण्‍टप्रो स्‍मार्ट सिलिंग पंखे सादर उच्‍च दर्जाच्‍या एअर कम्‍फर्टसह दुप्‍पट शांत कार्य आणि जवळपास ५० टक्‍क्‍यांची वीज बचत क्रॉम्‍प्‍टनतर्फे प्रगत आयओटी - सक्षम सायलण्‍टप्रो स्‍मार्ट सिलिंग पंखे सादर उच्‍च दर्जाच्‍या एअर कम्‍फर्टसह दुप्‍पट शांत कार्य आणि जवळपास ५० टक्‍क्‍यांची वीज बचत Reviewed by News1 Marathi on May 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads