Header AD

माणूस वाचविण्यासाठी ठाणेकर म्हणून एकत्र काम करूया ना. एकनाथ शिंदे यांनी साधला सर्व डॅाक्टरांशी संवाद

 

■ठाणे शहरातील डॅाक्टरांशी संवाद साधताना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे. सोबत महापौर नरेश गणपत म्हस्के, खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा...


ठाणे ,  प्रतिनिधी  ;   गेले अनेक दिवस आपण सर्वजण कोविडशी लढा देत आहोत पण या घडीला मृत्यू दर कमी करण्याबरोबरच रूग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रूग्णांचा प्राण वाचविण्यासाठी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करा. ठाणेकर म्हणून सर्वांनी या घडीला एकत्र काम करूया असे भावनिक आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी आज दुरदृष्य प्रणालीद्वारे ठाणे शहरातील सर्व खासगी रूग्णालयांच्या डॅाक्टरांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के, खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा आदी उपस्थित होते.


          सद्यस्थितीत कोविड रूग्णांच्या मृत्यूचा दर वाढत आहे. ही चिंतेची बाब असून तो दर कमी करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. आजपर्यंत आपण सर्वजण एक टीम म्हणून काम करीत आलो आहे. मी स्वत: आणि राज्य शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

          

          कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर बोलताना ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, सर्व हॅास्पीटल्स मग ते खासगी असो की सरकारी असो त्यांनी कोविड उपचार घेणाऱ्या रूग्णांचा प्राण वाचावा यासाठी शर्थीचे प्रयतेन केले पाहिजेत. त्यांना मानसिक धीर दिला पाहिजे जेणेकरून मृत्यूचा दर कमी होईल. त्याचबरोबर फायर ॲाडिट, विद्युत ॲाडिट आणि ॲाक्सीजन यंत्रणा ॲाडिट करण्याची आवश्यकता असून ते केले तर भविष्यात होणारी मोठी हानी टळू शकते असे सांगितले.

          

           ॲाक्सीजनचा तुटवडा सर्वत्रच आहे. त्यामुळे ज्या रूग्णांना ॲाक्सीजनची आवश्यकता आहे त्यांना ऑक्सिजन देण्यात यावा असे सांगून तातडीच्या वेळी ऑक्सिजनसाठी महानगरपालिका मदत करेल असे ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

           

           यावेळी डॅाक्टरांच्या अनेक प्रश्नांवा उत्तर देताना त्यांनी ही वेळ एकजुटीने काम करण्याची आहे. माणूस वाचविण्यासाठी शर्थीने प्रयतेन करण्याची आहे, त्यांना मानसिक धीर देण्याची आहे त्यासाठी आपण सर्वजण ठाणेकर म्हणून काम करूया असे सांगितले. तसेच त्यांनी कोविड काळात करत असलेल्या कामाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. 

           

          प्रारंभी महापौर नरेश म्हस्के यांनी डॅाक्टरांशी संवाद साधताना कोविड काळात काम करताना काय अडचणी येत आहेत याचा आढावा घेतला आणि महापालिकेच्यावतीने आवश्यक ते सहकार्य करेल असे सांगितले. 

          

          कोविड असो किंवा आरोग्याचा प्रश्न असो ठाणे महानगरपालिका सातत्याने डॅाक्टरांच्या पाठीशी उभी राहिली आहे आणि यापुढेही सोबत राहिल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

          

          महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी शहरातील डॅाक्टरांनी केलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आली असून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.


माणूस वाचविण्यासाठी ठाणेकर म्हणून एकत्र काम करूया ना. एकनाथ शिंदे यांनी साधला सर्व डॅाक्टरांशी संवाद माणूस वाचविण्यासाठी ठाणेकर म्हणून एकत्र काम करूया ना. एकनाथ शिंदे यांनी साधला सर्व डॅाक्टरांशी संवाद Reviewed by News1 Marathi on May 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads