Header AD

पत्रकारांचे लसीकरण करण्याची शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांची मागणी




डोंबिवली ( शंकर जाधव ) लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार हे नेहमीच जनतेपर्यत घडलेल्या घटनांची  माहिती पोहोचवत असतात.कोरोनाच्या या काळात पत्रकारिता करताना पत्रकार अनेकांच्या संपर्कात येत असतात. अश्या वेळी पत्रकारांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकरता येत नाही.कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे.


           त्यामुळे सर्व पत्रकारांचे लसीकरण होणे आवश्यक आहे.याकरता शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी तशी ससर्व पत्रकारांना फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांप्रमाणे लसीकरण करण्यासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कोरोनां रुग्णां ऑक्सिजन मिळणे कठीण झाले होते. त्यात तज्ञांच्या मते देशात तिसरी लाट येण्याची शक्यता नाकरता येत नाही.म्हणून कल्याण –डोंबिवली महानगरपालिका हद्दीत एक सुसज्ज ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर उभारावे अशी विनंती मोरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

पत्रकारांचे लसीकरण करण्याची शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांची मागणी पत्रकारांचे लसीकरण करण्याची शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांची मागणी Reviewed by News1 Marathi on May 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads