Header AD

नालेसफाई कामात कोणत्याही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही आयुक्त डॉक्टर पंकज आशिया.

 
भिवंडी , प्रतिनिधी  ;  भिवंडी शहर हे  कामवारी नदीकिनारी वसलेले आहे,या शहरात दरवर्षी खाडीकिनारी पूरस्थिती निर्माण होत असते, ही पूरपरिस्थिती टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नालेसफाई व गटार सफाई करण्यात येणार आहे. याबाबत प्रभाग समिती क्रमांक तीन व पाच मध्ये नालेसफाई कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कामाला सुरुवात झाली आहे.

               तर प्रभाग समिती क्रमांक 1, 2 व 4 मध्ये नालेसफाई निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या प्रभागातील देखील नालेसफाई काम सुरू करण्यात येणार आहे. नाले सफाई कामाची जबाबदारी संबंधित प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक,  प्रभागातील बांधकाम कनिष्ठ अभियंता यांची आहे. नाले व गटार सफाई कामात कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा किंवा हयगय खपवून घेतली जाणार नाही जे अधिकारी हा नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा करतील त्यांच्या विरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी दिला आहे.


              जर नाले व गटर सफाई कामे चांगल्या प्रकारे झाली नाही तर शहरात पूरस्थिती निर्माण होते ही बाब लक्षात घेऊन दर वर्षी मान्सून पूर्व सर्व नाल्यांची सफाई करण्यात येते. दरवर्षी शहरात खाडीकिनारी व काही सखल भागात पूरस्थिती निर्माण होते. त्याचा त्रास सामान्य गरीब नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतो. तसेच शहराचे आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होतो, काही वेळेला जीवित व वित्तहानी होते, ही बाब लक्षात घेता नालेसफाई करण्यात येत असते महापालिका क्षेत्रात एकूण सर्व लहान-मोठे मिळून एकूण 92 नाले आहेत. असून त्यांची रुंदी जवळपास 42685 मीटर आहे.


              प्रभाग समिती क्रमांक एक मध्ये 17 प्रभाग समिती 2 मध्ये 14, प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये 26, प्रभाग समिती क्रमांक चार मध्ये तेरा आणि प्रभाग समिती क्रमांक पाचमध्ये 22 असे एकूण 92 छोटे-मोठे नाले शहरात आहेत. या नालेसफाईच्या कामावर पालिका अंदाजे एक ते दीड कोटी रुपये खर्च करते. शहरात खाडीकिनारी तसेच अनेक सखल भागात पाणीच असते या पाणी साचण्याकडे देखील लक्ष देण्यात यावे, सखल भागात प्राधान्याने गटार सफाईची स्वच्छता ठेवण्यात यावी.


            वेळच्यावेळी गटार देखील साफ करणे आवश्यक आहे, गटारांमध्ये घाण काढून गटारे प्रवाहित करण्यात यावीत,गटारातील व मलनिस्सारण चेंबर मधील पाणी रस्त्यावर येणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी यांनी घ्यावी व गटार सफाईची चांगली झाल्या शहरात पूरस्थिती निर्माण होणार नाही व त्याचा त्रास सामान्य नागरिकाला होणार नाही ही बाब लक्षात घेता नालेसफाई कडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.           नालेसफाई ठेकेदार यांच्या बरोबरच  सर्व संबंधित बांधकाम व आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी नाले व गटारे सफाई काम चांगल्या प्रकारे लक्ष द्यावे, नालेसफाईच्या कामात कोणत्याही प्रकारे  हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी सर्व संबंधित अधिकारी यांना दिला आहे.
नालेसफाई कामात कोणत्याही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही आयुक्त डॉक्टर पंकज आशिया. नालेसफाई कामात कोणत्याही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही आयुक्त डॉक्टर पंकज आशिया. Reviewed by News1 Marathi on May 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads