Header AD

व्हॉट्सअ‌ॅपवर व्हिडिओ स्टेटस ठेवून तरुणाची नदीत उडी घेत आत्महत्या
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मोबाईलमधील व्हॉट्सअ‌ॅपवर व्हिडिओ स्टेटस ठेवून एका तरुणाने नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पुलानजिक घडली. मयूर रामा जाधव (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.


मयूर हा कल्याण पश्चिम परिसरातील बारावे या गावात कुटुंबासह राहत होता. आज सकाळपासूनच तो दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले. खळबळजनक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी मयूरने आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये दारू ही माणसाच्या जीवनातील सगळ्यात बेकार गोष्ट असल्याचे त्याने नमूद केले. 


पुढे त्याने या व्हिडिओ स्टेटसमध्ये म्हटले कीकाही गोष्टी अशा घडल्या कीआता समोर काहीच रस्ता दिसत नाही. माझी आठवण जेव्हा काढाल तेव्हा हसून आठवण काढातुमच्या जीवनातील असा जोकर होता तोआतून तुटलेलामात्र तुम्हाला हसवत राहिलाअसे म्हणत त्याने गांधारी पुलावरून नदीपात्रात उडी घेतली.


मोबाईलवरील व्हिडिओ स्टेटसमुळे ही घटना समोर येताच खडकपाडा व पडघा या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाच्या मदतीने मयूरच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे. मात्रत्याने आत्महत्या करणाऱ्यासारखे टोकाचे पाऊल का उचललेयाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

व्हॉट्सअ‌ॅपवर व्हिडिओ स्टेटस ठेवून तरुणाची नदीत उडी घेत आत्महत्या व्हॉट्सअ‌ॅपवर व्हिडिओ स्टेटस ठेवून तरुणाची नदीत उडी घेत आत्महत्या Reviewed by News1 Marathi on May 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads