Header AD

भारताच्या विभाजनाची पुनरावृत्ती टाळायची असेल, तर वीर सावरकरांचाच मार्ग अनुसरावा लागेल - रणजीत सावरकर


■स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान कारागृहातून सुटकेच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त विशेष परिसंवाद


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंना नेहमी सतर्क केले आहे. त्यांनी सांगितलेली अनेक भाकीते खरी ठरली आहेत. वर्ष १९२० मध्ये तेव्हाच्या भारतात मुसलमानांची लोकसंख्या २२  प्रतिशत झाल्यावर खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्याच्या नावाखाली देशभरात दंगली करून केरळ-बंगालमध्ये लाखो हिंदूंना ठार मारले. गेल्या वर्षी २०२० मध्ये पुन्हा २२ प्रतिशत लोकसंख्या झालेल्या मुसलमानांनी १०० वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती करत दिल्लीत दंगल करून अनेक हिंदूंना मारले.


वर्ष १९४७ ला त्यांची लोकसंख्या ३५ प्रतिशत झाल्यावर त्यांनी त्या वेळी देशभरात दंगली घडवून भारताचे विभाजन केले. तर वर्ष २०४७ मध्ये त्यांची लोकसंख्या ३५ प्रतिशत झाल्यास भारताच्या विभाजनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. ही इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल आणि हिंदूंना वाचवायचे असेलतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गाचे अनुसरण करावे लागेलअसे स्पष्ट प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदुहृदयसम्राट वीर सावरकर : अंदमान कारावासातून सुटकेची शताब्दी पूर्ती’ या ऑनलाईन विशेष परिसंवादात बोलत होते. हा कार्यक्रम यू-ट्यूबच्या माध्यमातून ५४३१ लोकांनी पाहिला.

 

          या वेळी बोलतांना भारताचे माहिती आयुक्त तथा ज्येष्ठ पत्रकार उदय माहूरकर म्हणाले कीवीर सावरकर यांचा प्रखर राष्ट्रवाद हा मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या आड येत असल्यामुळे काँग्रेसकडून त्यांना विरोध झाला. सावरकरांचे म्हणणे ऐकले असते,तर वर्ष १९४७  ला देशाचे विभाजन झाले नसते. विभाजनाची सिद्धता चालू असल्याविषयी ते वर्ष १९३६ पासून सांगत होते. सावरकरांचे विचार कृतीत आणलेतर संपूर्ण देश एक होऊ शकतो;मात्र या लोकांना ते नको आहे. सावरकरांना तीन प्रकारचे लोक विरोध करतातएक म्हणजे मुसलमान पक्षदुसरे कम्युनिस्ट आणि तिसरे मुसलमानांच्या मतांसाठी भिकारी असणारे राजकीय पक्ष.


अंदमानातील छळामुळे काही कैद्यांनी आत्महत्या केली,तर काही वेडे झालेमात्र या सर्व कठोर यातना सहन करत वीर सावरकरांनी राष्ट्रहितासाठी हजारो पानांचे अजरामर साहित्य लिहिले. धर्माचे स्थान हृदयात असतेपोटात नाही’, असे सांगून कारागृहात धर्मांतरीत हिंदूंचे शुद्धीकरण त्यांनी केले. सावरकरांनी हिंदूंना राष्ट्रीय अस्मिता जपण्यासाठी शिकवले असल्याचे या वेळी बोलतांना प्रसिद्ध लेखक आणि प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे यांनी सांगितले.

 

तर हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक सुमीत सागवेकर म्हणाले कीसावरकरांना माफीवीर म्हणणारे काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी हिंमत असेलतर अंदमानात जाऊन कोलू फिरवून दाखवावा. केवळ दोन-तीन भाषणे दिल्यावर विश्रांतीसाठी बँकाकमध्ये जाणार्‍यांकडून काय अपेक्षा करू शकतो. जेएन्यूमध्ये सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासणार्‍या तुकडे-तुकडे गँगने प्रथम उत्तर द्यावे की, ‘कॉम्रेड डांगे यांनी ब्रिटिशांची माफी का मागितली होती आणि ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहीन’, असे का म्हटले होते ?

भारताच्या विभाजनाची पुनरावृत्ती टाळायची असेल, तर वीर सावरकरांचाच मार्ग अनुसरावा लागेल - रणजीत सावरकर भारताच्या विभाजनाची पुनरावृत्ती टाळायची असेल, तर वीर सावरकरांचाच मार्ग अनुसरावा लागेल - रणजीत सावरकर Reviewed by News1 Marathi on May 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads