Header AD

जेष्ठ नागरिक व विकलांगासाठी लसीकरणाची वेगळी मोहीम राबविण्याची राष्ट्रवादीची मागणी
कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी पाहता कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात जेष्ठ नागरिक व विकलांगासाठी लसीकरणाची वेगळी मोहीम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वक्ता प्रशिक्षण विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

 


कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगात लसीकरणास गती देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर केडीएमसीही प्रयत्नशील आहे. केडीएमसीच्या लसीकरण केंद्रांवर होणारी तुफान गर्दी पहाता नियोजनाचाअभावा स्पष्ट स्वरुपात ठळकपणे दिसत आहे. त्यामुळे ही केंद्रेच उद्याला सुपर स्प्रेडर म्हणून फेलाव करण्याची दाट शक्यता वाटत आहे. म्हणून लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने जसे युरोपियन देशांनी व मुंबई महापालिकेने ड्रायव्हि इन लसीकरणचा उपक्रम राबविला आहे तसेच आपल्या महापालिकेने ही असाच उपक्रम राबविण्याची मागणी सुभाष गायकवाड यांनी केली आहे.


राजस्थान सरकारने एक पाऊल पुढे टाकत डोअर टू डोअर लसीकरण करण्याला सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर केडीएमसी क्षेत्रात निदान सोसायटी, बिल्डिंग, चाळ,झोपडपट्टी,मोहल्ले इथे त्याची सोय करावी. ज्येष्ठ नागरिक लोकांना व विकलांग व्यक्तींना त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्याची नितांत गरज आहे. जेणेकरुन गर्दी टाळून संसर्गजन्य कोविड व्हायरसचा फैलाव रोखने व त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

जेष्ठ नागरिक व विकलांगासाठी लसीकरणाची वेगळी मोहीम राबविण्याची राष्ट्रवादीची मागणी जेष्ठ नागरिक व विकलांगासाठी लसीकरणाची वेगळी मोहीम राबविण्याची राष्ट्रवादीची मागणी Reviewed by News1 Marathi on May 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads