Header AD

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले कोविड योद्ध्यांचे कौतुक

 





अक्षय तृतीया निमित्त कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे केले तोंड गोड....

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : गेल्या एक दिड वर्षांपासून असलेल्या कोवीडमूळे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी हे घरदार विसरून कोवीडशी लढत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासह त्यांचे कौतुक करण्यासाठी आज डोंबिवलीमध्ये आगळा वेगळा सोहळा संपन्न झाला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कोवीड रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.


आज अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद हे दोन्ही सण आज एकाच दिवशी आले आहेत. त्याचे औचित्य साधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा कृतज्ञता सोहळा आयोजित करत अनोख्या पद्धतीने साजरा केला. डोंबिवली पूर्वेतील वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलात असणाऱ्या कोवीड रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा यावेळी यथोचित सन्मान करत मिठाईचे वाटप करत कर्मचाऱ्यांचे तोंड गोड केले.


कोवीड रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी हे स्वतःचा जीव धोक्यात घालून गेले दिड वर्ष काम करत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न केल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना डोंबिवली शहरप्रमूख राजेश मोरेराजेश कदमदिपेश म्हात्रेडॉ. राहुल घुलेराहुल लोंढेमहेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले कोविड योद्ध्यांचे कौतुक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले कोविड योद्ध्यांचे कौतुक Reviewed by News1 Marathi on May 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads