Header AD

आमदार संजय केळकर यांच्या मार्फत एस. टी. कर्मचाऱ्यांना मोफत "समतोल आहाराची" व्यवस्था..


समतोल सेवा फाउंडेशन सामाजिक संस्थे मार्फत उपक्रम..


ठाणे, प्रतिनिधी  ;  आमदार संजय केळकर यांच्या मार्फत, समतोल सेवा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने खोपट एस टि बस स्थानकातील चालक, वाहक व कर्मचारी यांना या लॉकडाऊन काळात मोफत समतोल आहाराची (जेवणाचे टिफीन) व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी समतोल फाउंडेशन चे विजय जाधव उपस्थित होते. आ. केळकर हे या फाउंडेशन चे विश्वस्थ आहेत. 


         कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच अनेकदा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची जेवणाची गैरसोय होते. सकाळी लवकर घराबाहेर पडल्यामुळे घरून डबा आणणे शक्य होत नाही .त्याच अनूषंगाने समतोल फाउंडेशन वतीने अत्यावश्यक सेवेतील कर्मच्याकरिता मोफत टिफीन सेवा सुरू करण्यात आली आहे असे आ. केळकर यांनी बोलताना सांगून नोंदणी केलेल्या ५० कर्मचाऱ्यांना ही सेवा पुरविण्यात आली असल्याचे सांगितले. 


             लॉकडाऊन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे तर काही जण आपला जीव धोक्यात घालून आपले कर्त्यव्य एकनिष्ठेने पार पाडत आहेत, कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. अशा लोकांना मदतीचा हात म्हणून तसेच आपलेही कर्त्यव्य असल्याचे या भावनेतुन  एस टी कर्मचाऱ्यांना मोफत 4जेवण टिफीन ची व्यवस्था केली असल्याचे आ. केळकर यांनी बोलताना सांगून अशा काम करणाऱ्या व्यक्तींच्या मागे समाजाने पाठीशी उभे राहुन त्यांना पाठबळ दिले पाहिजे असे सांगितले. 


           समतोल फाउंडेशन चे अध्यक्ष विजय जाधव यांच्या मार्गद्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एसटी कर्मचा्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


          यापूर्वी आ. केळकर यांनी या फाउंडेशन च्या माध्यमातून सिव्हिल रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर यांच्या करिता जेवणाची तसेच एनर्जी ड्रिंक ची व्यवस्था केली असून हायवेवरील ट्रक चालकांसाठी ही या संस्थेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केली आहे. यावेळी खोपट एस टी बस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. 

आमदार संजय केळकर यांच्या मार्फत एस. टी. कर्मचाऱ्यांना मोफत "समतोल आहाराची" व्यवस्था.. आमदार संजय केळकर यांच्या मार्फत एस. टी. कर्मचाऱ्यांना मोफत "समतोल आहाराची" व्यवस्था.. Reviewed by News1 Marathi on May 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads