Header AD

तौक्ते चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या दिव्यांग कुटुंबास शिवसेनेची मदत
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  तौक्ते चक्रीवादळाचा फटका सर्वच ठिकाणी बसला असून यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच चक्रीवादळामुळे कल्याण पूर्वेतील दिव्यांग कुटुंबाच्या घराचे नुकसान झाले होते. या कुटुंबाच्या मदतीसाठी शिवसेना पुढे आली असून माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडेआणि शिवसैनिकांनी या कुटुंबाला ५ हजार रुपये आर्थिक मदत करत एकप्रकारे आधार दिला आहे.  


कल्याण पूर्व  येथील नवीन जिम्मीबाग परिसरात एस.एस.चंद्रिकापुरे चाळीत भाड्याने राहणारे वाघमारे कुटुंबीयांचे वादळात घराचे छप्पर तुटूनभिंती ढासळल्या. सुदैवाने त्या घरात राहणारे विजय वाघमारे हे सुदैवाने बचावले. विजय वाघमारे हे दिव्यांग व्यक्ती असून वादळाने त्यांचं घर उध्वस्त केले. हे कळताच कल्याण-पूर्व येथील शिवसेना पदाधिकारीशिवसेना उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे आणि शिवसैनिक यांनी परिस्थितीचा आढाव घेतला व तात्काळ ५ हजार रुयांची आर्थिक मदत करण्यात केली.


यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे,शिवसेना उपशहर संघटक दिलिप दाखिनकर, शिवसेना महिला उपशहर संघटक आशा रसाळ, शाखाप्रमुख विवेक बर्वे, उपशाखा प्रमुख रवि खांदोडे यांनी भेट दिली.

तौक्ते चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या दिव्यांग कुटुंबास शिवसेनेची मदत तौक्ते चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या दिव्यांग कुटुंबास शिवसेनेची मदत Reviewed by News1 Marathi on May 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads