Header AD

अमृत योजनेचे 'अमृत' आले नागरिकांच्या दारी

 




नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने ग्रामीण भागात अमृत योजना कार्यान्वित ,आडिवली गावातील गावकऱ्यांना दिलेला शब्द केला पूर्ण...

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्वेतील ग्रामीण भागात अमृत योजनेतील 'अमृतआडिवली गावातील नागरिकांच्या दारी आले आहे. ग्रामीण भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाठवपुरावा केलेली अमृत योजना अखेरीस कार्यान्वित झाली आहे.


ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण पाहून कुणाल पाटील यांनी या भागात अमृत योजना आणण्यासाठी मोठा पाठपुरावा केला. या योजनेच्या मंजुरी नंतर हे काम देखील स्वतः उपस्थित राहून पूर्ण करून घेतले. अखेर हे काम पूर्ण झाल्याने आडिवली मधील नागरिकांच्या घरी पाण्याच्या रूपाने अमृतच आले असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. 


कुणाल पाटील यांनी नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण केल्यानेनागरिकांच्या घरोघरी जाऊन या पाण्याची पाहणी केली. यावेळी आडिवली गावातील गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पाहायला मिळाला.

अमृत योजनेचे 'अमृत' आले नागरिकांच्या दारी अमृत योजनेचे 'अमृत' आले नागरिकांच्या दारी Reviewed by News1 Marathi on May 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads