Header AD

आगामी पावसाळ्यात सखल भागातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी संक्रमण शिबिरांची व्यवस्था करा महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी




कल्याण , कुणाल  म्हात्रे : आगामी पावसाळ्यात सखल भागातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी संक्रमण शिबिरांची व्यवस्था करावी असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी दिले आहेत.


मान्सून पूर्व तयारी व आपत्कालीन व्यवस्था यासंदर्भात महापालिका अधिकारी व महापालिका क्षेत्रातील इतर शासकीय यंत्रणा यांचे समवेत घेण्यात आलेल्या बैठकीत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हे निर्देश दिले. महापालिकेच्या काही प्रभागातील सखल भागात अतिवृष्टी झाल्यास लोकांच्या घरात पाणी शिरते अशावेळी सदर नागरिकांची तातडीने राहण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागातील सखल भागांची पाहणी करावी आणि त्या अनुषंगाने संक्रमण शिबिराची व्यवस्था करावी अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या. महापालिका प्रभागातील अतिधोकादायक,धोकादायक इमारतींची माहिती देखील आयुक्तांनी या बैठकीत घेतली तसेच अतिधोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या कराव्यात अशा सूचना पालिका आयुक्तांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिल्या.


पावसाळ्यात प्रामुख्याने कन्स्ट्रक्शन साईट सारख्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊन डेंगीमलेरिया यासारख्या साथीचा प्रादुर्भाव वाढतो. यासाठी अशा जागा शोधून तेथे औषध फवारणी करावी तसेच वेळोवेळी धूर फवारणीही चालू ठेवावी आणि पावसात कुठेही कचरा साठणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालिका आयुक्तांनी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना दिल्या. त्याच प्रमाणे लेप्टोस्पायरोसिस सारखी साथ उद्भवू नये म्हणून झोपडपट्टयांसारख्या सारख्या वस्तीत उंदरांची बिळे शोधून तेथे औषध फवारणी करावी अशा सूचना देखील पालिका आयुक्तांनी घनकचरा विभाग आणि साथरोग नियंत्रण अधिकारी यांना दिल्या.


अतिवृष्टीमुळे किंवा निसर्ग चक्रीवादळ यासारख्या एखाद्या आपत्तीच्या प्रसंगी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून  इमारतींवर असलेले धोकादायक  होर्डिंग्स काढून टाकावेत अशा सूचना देखील पालिका आयुक्तांनी मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याच प्रमाणे महापालिकेची व खाजगी कोविड हॉस्पिटल ज्या ठिकाणी आहेत त्याच्या आजूबाजूला असलेल्या झाडांमुळे पावर फेल्युअर होणार नाही   याची दक्षता घेणे बाबत सूचना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी उद्यान विभागाचे संजय जाधव यांना दिल्या. पावसाळ्यापूर्वी महापालिका परिसरातील रस्त्यावरील खड्डे वेळेवर भरणेनालेसफाई पावसाळ्यापूर्वी करून घेणे त्याच प्रमाणे सखल भागा मध्ये चेंबरवरची प्लास्टिकची झाकणे काढून तेथे काँक्रीटची झाकणे बसवणे यासंदर्भात दक्षता घेणे बाबत  सूचना त्यांनी शहर अभियंता सपना कोळी यांना दिल्या.


महापालिका परिसरात सुरु असलेल्या रिंग रोड च्या कामात वॉटर लॉगिंग होणार नाही याची काळजी घेणे बाबत सूचनाही आयुक्तांनी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जयवंत ढाणे यांना दिल्या तसेच रेल्वे लाईनच्या परिसरातील वॉटर लॉगिंग बाबतची माहिती घेऊन उपाय योजना बाबतच्या सूचना आयुक्तांनी रेल्वेचे एरिया ऑफिसर प्रमोद जाधव यांना दिल्या.


या मान्सून पूर्व बैठकीत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवारशहर अभियंता सपना कोळीपोलीस उपायुक्त विवेक पानसरे एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जयवंत ढाणे,  जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता महाजन, वाहतूक सहा. आयुक्त उमेश मानेपालिका सचिव संजय जाधवमहापालिकेचे सर्व  प्रभाग क्षेत्र अधिकारी उपस्थित होते.

आगामी पावसाळ्यात सखल भागातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी संक्रमण शिबिरांची व्यवस्था करा महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी आगामी पावसाळ्यात सखल भागातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी संक्रमण शिबिरांची व्यवस्था करा महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी Reviewed by News1 Marathi on May 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads