Header AD

राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेत सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरला ठाण्याचा विवान देशपांडे!ठाणे,  प्रतिनिधी  ;  ठाणे शहरातील  चि. विवान देशपांडे याने 'वागेश्वरी संगीत विद्यालय व साईकेदार बोधनकर यु ट्यूब चॅनल' आयोजित 'भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन अभंग स्पर्धा २०२१' यात ५०% परिक्षकांचे गुण व ५०% प्रेक्षकांचे व्ह्यूज् व लाईक्स या निकषावर 'विशेष लोकप्रिय स्पर्धक' या गटात प्रथम पारितोषिक पटकावले आहे. या स्पर्धेत बालगटात संपूर्ण महाराष्ट्रातुन अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 


           परीक्षक म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंत व्यक्तिंनी परिक्षण केले होते.  बाल गायक कलाकार विवान हा  सौ. वैष्णवी अग्निहोत्री संचलित तपस्या संगीत अकॅडमी, ब्रह्मांड ठाणे यांचा विद्यार्थी असून श्री. मिथिल गावडे यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे  शिक्षण घेत आहे.


           ठाणे येथील सुप्रसिद्ध ब्रह्मांड कट्टा या संस्थेचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांनी आपल्या या बालसदस्याचे राज्यस्तरीय स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल विशेष कौतुक केले असून भविष्यात कलाप्रदर्शनासाठी सर्वतोपरी पाठिंबा व व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली आहे. सादरीकरणाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवणाऱ्या  विवानवर सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेत सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरला ठाण्याचा विवान देशपांडे! राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेत सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरला ठाण्याचा विवान देशपांडे! Reviewed by News1 Marathi on May 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads