Header AD

भिवंडीत लसीकरणात स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्याची मागणी

   
भिवंडी दि. १२ (प्रतिनिधी ) भिवंडीतील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी करण्यात येणारे लसीकरण सध्या लसींच्या अभावामुळे बंद करण्यात आले असल्याने भिवंडी ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्येत वाढ झाली आहे. मात्र लसीकरण सुरु असतांना ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ठाणे मुंबई व आजूबाजूच्या शहरातील नागरिक येऊन लसीकरण करत असल्याची बाब अनेक वेळा समोर आली असून स्थानिक ग्रामीण भागातील नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात यावी व ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच इतर शहरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लस द्यावी अशी मागणी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य ब बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे बाळ्या मामा यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

           
               राज्य शासनामार्फत लसीकरणासाठी ऑनलाईन प्रक्रिया राज्यात राबवली जात आहे. ग्रामीण भागातील लोकांना स्मार्ट फोन, इंटरनेट, मोबाईल नेटवर्क याच्या अभावी प्रत्येकाला नोंद करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना कोरोनाच्या लसीकरणापासून वंचित रहावे लागत आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये शहरी भागातील लोक लसिचे ऑनलाईन रजिस्टर करून मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.


             त्यामुके ग्रामीण भागातील नागरिकांना लासीकरणासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून सध्या ग्रामीण भागातील लससाठा देखील संपुष्टात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक लासीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील स्थानिक नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरती त्यांच्या आधारकार्डच्यामार्फत ऑफलाईन प्रक्रिया राबवून प्रथम प्राधान्य देऊन, ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त लसीकरणाची संधी निर्माण करून लाभ मिळवून द्यावा अशी मागणी माजी सभापती सुरेश म्हात्रे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

भिवंडीत लसीकरणात स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्याची मागणी भिवंडीत लसीकरणात स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्याची मागणी Reviewed by News1 Marathi on May 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads