Header AD

डोंबिवलीतील विवेकानंद सोसायटीत कचरा व्यवस्थापन योजनेचा शुभारंभ उपायुक्त कोकरे यांच्या हस्ते उदघाटन
डोंबिवली  ( शंकर  जाधव ) डोंबिवलीचा सांस्कृतिक ठेवा अशी ओळख असलेल्या विवेकानंद सोसायटीत  कचरा व्यवस्थापन योजनेचा  प्रारंभ झाला.या योजनेचे उदघाटन कल्याण डोंबिवली पालिकेचे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी
सारस्वत काँलनी येथील माजी नगरसेविका खुशबू चौधरी , प्रमुख आरोग्य अधिकारी वसंत देगलूरकर, पर्यावरण दक्षता मंचाच्या रुपाली शाईवाले ,  सोसायटीचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी , कर्मचारी , रहिवासी उपस्थित होते.
केंद्र शासनाने कचरा व्यवस्थापन बाबत  निर्बंध घातले आहेत. त्यानुसार विविध संकुले, आस्थापना यांना कचरा व्यवस्थापन बाबत नियोजन करणे आवश्यक आहे.            याचा विचार करुन विवेकानंद सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेविका खुशबू चौधरी यांच्या माध्यमातून २०१८पासून या कचरा व्यवस्थापनाचा पालिकेकडे पाठपुरावा केला.खुशबू चौधरी यांनी यासाठी उपायुक्त कोकरे यांचे मार्गदर्शन घेतले. या  योजनेला आकार देण्यात चौधरी यांना यश आले.सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.पाच लाख खर्च करुन सोसायटीच्या वतीने श्रेडींग यंत्र खरेदी करण्यात आले. या मशीनच्या सहाय्याने विलगीकरणाने  आलेल्या ओला कच-या पासून सोसायटीच्या आवारात खत निर्मिती करण्यात येणार आहे.विवेकानंद सोसायटीत एकूण १७ इमारती  आणि ४१०सदनिका आहेत.


          दररोज ३००किलो ओला सुका कचरा निर्माण  होत असतो. त्यापैकी दिडशे ते दोनशे किलो ओला कच-याचे श्रेडिंग  करण्यात येईल.यामुळे कच-याचे खत होण्याच्या प्रक्रियेस गती मिळेल.असे सोसायटीचे सचिव रमेश खुजे यांनी सांगितले.या प्रकल्प शुभारंभ प्रसंगी विवेकानंद सोसायटी चे अध्यक्ष रामचंद्र मारके, कमिटी सदस्य विजय पंडितराव, श्रीपती संत्री, विजय देसाई, भामरे, कमलापूरकर, गणेश पांढरतांबे , भाजपाचे पदाधिकारी प्रमोद भागवत, सुनील मिश्रा, विनय मणेरीकर, पालकर, राजेंद्र फडके, मोनाली उपस्थित होते.
डोंबिवलीतील विवेकानंद सोसायटीत कचरा व्यवस्थापन योजनेचा शुभारंभ उपायुक्त कोकरे यांच्या हस्ते उदघाटन डोंबिवलीतील विवेकानंद सोसायटीत कचरा व्यवस्थापन योजनेचा शुभारंभ उपायुक्त कोकरे यांच्या हस्ते उदघाटन Reviewed by News1 Marathi on May 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads