Header AD

आभा परिवर्तन वादी संस्थेचा गरजूंना मदतीचा हात
कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत. अशा अनेक गरजूंना आभा परिवर्तनवादी संस्थेने  मदतीचा हात दिला आहे.


पहिल्या लॉकडाऊन मधून सामान्य जनता सावरत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागला आणि नाईलाजाने पुन्हा दुसऱ्यांदा लॉक डाऊन लावावा लागला. पण या सगळ्या प्रक्रियेत हातावर पोट असलेल्या अनेक लोकांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत पडली. टॅक्सी चालकबिगारीमाथाडी कामगार किंवा ओझ्याची काम करणारे आणि मिळालेल्या रोजीवर पोटभरणाऱ्या लोकांच्या समस्या वाढल्या.

 

आभा परिवर्तनवादी संस्थेच्या माध्यमातून मागील दोन आठवड्यापासून वरळीदादरप्रभादेवी परिसरात बेघर आणि गरजु लोकांना अन्न पुरवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. खाना चाहीये मुंबई या संस्थेच्या सहकार्याने हे काम अविरतपणे चालु आहे. आतापर्यंत २००० लोकांना जेवण देऊन त्यांची भूक मिटवण्याचा छोटासा प्रयत्न आभा संस्था करीत आहे असे संस्थेच्या उपाध्यक्षा पल्लवी गोंधळेकर यांनी सांगितले. यासोबत परिसरातील कोविड बाधित रुग्ण ज्यांना होम क्वारन्टीन केलं आहे त्यानं सुद्धा संस्थेच्या माध्यमातून जेवण पुरवले जात आहे.


मागील वर्षी पहिल्या लॉक डाउन मध्ये सुद्धा आभा संस्थेमार्फत वरळी कोळीवाडा परिसरात २५० पेक्षा जास्त कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होत. सोबत विभागातील महिलांना सॅनिटरी पॅडचे सुद्धा वाटप करण्यात आले होते. या महामारीच्या संकटात जास्तीत जास्त तरुणांनी पुढाकार घेऊन आपलं योगदान द्यावे जेणेकरून या भयंकर संकटातून आपल्याला सावरण्यास मदत होईल असे आवाहन संस्थेचे संस्थापक राजेश मोरे यांनी केले.

आभा परिवर्तन वादी संस्थेचा गरजूंना मदतीचा हात आभा परिवर्तन वादी संस्थेचा  गरजूंना मदतीचा हात Reviewed by News1 Marathi on May 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads