Header AD

समाजातील गरजू लोकांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप


■टीम परिवर्तन आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा एकत्रित उपक्रम...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  टीम परिवर्तन ही सामाजिक संस्था कोरोनाच्या संकटकाळात सातत्याने गरजु आणि वंचित लोकांना वेळोवेळी अन्नधान्य त्याचबरोबर कपडेमास्कसॅनिटायझ यांचे वाटप करत आहे. संस्थेने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मदतीने गेल्या आठवड्याभरात २४९ जणांना रेशन किटचे वाटप केले आहे.


पोलिस स्टेशन मधील फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या पोलिस बांधवांना स्टीमरसॅनिटायझ आणि मास्कचे वाटप संस्था करत आहे. लहान मुलांना बिस्कीटटँग त्याचबरोबर रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना शिजवलेले फूड पॅकेट संस्था देत आहे. या वाटप उपक्रमात पंकज वैद्यभावेश पैठणेमालोजी बोडके संजय जांगळीगौरव जाधवकरीयप्पा चलवादी हे युवक कामांचे नियोजन करत आहेत.


टीम परिवर्तन या संस्थेचे सदस्य मुंबईत विविध शहरांत वंचित घटकांसाठी काम करत आहेत त्यांच्या या कामांत अनेक लोकांनी आपले योगदान दिले आहे. यापुढे आम्हीं अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना मदत पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे संस्थेचे तुषार वारंग यांनी यावेळीं सांगितले. नागरिकांनी आपल्या परिसरात असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वंचित लोकांना आपल्या पध्दतीने मदत करण्याचे त्याचबरोबर शासनाच्या नियम अटी पाळण्याचे आवाहनही त्यांनी यावेळीं केले.

समाजातील गरजू लोकांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप समाजातील गरजू लोकांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप Reviewed by News1 Marathi on May 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads