Header AD

तौक्ते चक्री वादळाचा फटक्याने कल्याण डोंबिवलीत जागोजागी झाडांची पडझड, घराचे पत्रे उडुन घराचे नुकसान

कल्याण, कुणाल  म्हात्रे   : तौक्ते चक्रीवादळाचा वादळी वाऱ्याच्या पावसाने कल्याण डोंबिवलीला झोडपले असून अनेक ठिकाणी झाडे उन्मखून कोसळल्याने काही ठिकाणी रस्ते वाहतुकी साठी बंद करण्यात आली होती  तर दुसरी कडे वादळी वाऱ्याने इमारती वरीलाउभारण्यात आलेल्या शेडचे पत्रे तसेच बैठ्या चाळीतील घरावरील सिमेंटचे  व लोखंडी पत्रे उडून गेल्याने घरांचे नुकसान झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत .

   
           तौक्ते चक्रीवादळा सोबत  मान्सून पूर्व पावसाने दमदार लावलेली हजेरी लावली असून  रविवारी मध्यरात्री पासून केलेली सुरुवात सोमवारी अख्खा दिवस  संततधार पावसाची बेटिंग सुरु होती. कल्याण डोंबिवली शहरात या चक्रीवादळाच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी रस्त्या लागत असलेली झाडे व मोठी वृक्ष उन्मळून जमीनदोस्त झाली होती. ठाकुर्ली नजीक डोंबिवली कल्याणला जोडणाऱ्या नव्वद फुटी रस्त्याच्या पायथ्याशी एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने या रस्त्याने कल्याण व डोंबिवलीला ये जा करण्यासाठी होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती तर ९० फिट रस्त्याच्या कडेला लावलेली काही झाडे ही कोसळून पडलेली जागो जागी दिसत होती .


                  कल्याण पूर्वेतील लोकग्राम नाजिक असलेल्या जिमी बाग परिसरातील बैठ्या चाळीत राहणाऱ्या विजय वाघमारे या अपंग व्यक्तीच्या राहत्या घरावरचे सिमेंटचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून जात घराचे नुकसान झाले तर कल्याण डोंबिवली शहरातील अनेक इमारतीच्या टेरेस वर लोखंडी पत्र्याचे शेड उभारले असून काही इमारतीच्या लोखंडी शेडचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत .डोंबिवली पश्चिमे कडील राजून नगर परिसरात अनेक ठिकाणी विद्युत पोल वर झाडांच्या फांद्या पडल्याने विद्युत पोल वाकडे झाले तर काही ठिकाणी विद्युत वाहिन्याच्या तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता.

 


               तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा टिटवाळा शहरी भागासह ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. तौक्तेमुळे टिटवाळ्यासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत, तर अनेक  घरांचं नुकसान झालंय. तौक्ते चक्रीवादळ किनारपट्टी पासून आत समुद्रात हे असलं तरी किनारपट्टीच्या भागात वाऱ्यामुळे नुकसानीची शक्यता पाहता, प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. हवामान खात्यानेही सतकर्तेचा इशारा दिला आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळ घोंगावत आहे. आज सकाळ पासून या चक्रीवादळानं आणखी रौद्ररूप धारण केलं आहे.


               या वादळामुळे टिटवाळासह लगतच्या ग्रामीण भागातील ७० गावपाड्यात मोठ्या प्रमाणात झाले उन्मळून पडणे व घराचे छपर उडण्याच्या घटना घडल्या आहेत. टिटवाळा येथील रेल्वे स्टेशन ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावर मराठे फाॅच्युन या सोसायटीत समोर व युवराज पॅलेस या लाॅज लगत दोन मोठी झाडे दुपारी १ च्या सुमारास उन्मळून पडली आहेत. यामुळे या रस्त्यावरील रहदारी बंद झाली आहे. तसेच अशाच प्रकारचे झाड हरीओम व्हॅली सोसायटीच्या रस्त्यावर पडले आहे. तर ग्रामीण भागाड अनेक झाडे घरांवर व रस्त्यावर पडली असून घराची छपरे देखील उडाली आहेत. या वादळाने मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान केले आहे.             तसेच वीज वितरण कंपनीच्या खडवली फिडरच्या उच्च दाबाच्या  वाहीनीवर गोवेली काॅलेज मागे झाड पडले आहे. उच्च दाबाच्या वाहीनीचे कांब व मांजार्ली येथील दोन पोल पडले आहेत.  तसेल एलटी लाईनचे अनेक पोल पडले असल्याने दोन दिवस वीज पुरवठा खंडित झाला आहे. सदर दुरूस्तीचे काम अशा वादळात देखील वीज वितरण कंपनीचे कामगार करत आहेत. लवकर दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती उप कार्यकारी अभियंता धिरजकुमार धुवे यांनी दिली.        

                               "कल्याण ग्रामीण भागात वुक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असुन  सुदैवाने कुठल्याही प्रकाराची जीवीत हानीची घटना नाही. अपत्ती व्यवस्थापन पथक तत्पर असुन रस्ते वाहतूक सुरळीत आहे. वीज पुरवठा खंडित अखंडित सुरू असल्याचे तहसीलदार दिपक आडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले".

तौक्ते चक्री वादळाचा फटक्याने कल्याण डोंबिवलीत जागोजागी झाडांची पडझड, घराचे पत्रे उडुन घराचे नुकसान तौक्ते चक्री वादळाचा फटक्याने  कल्याण डोंबिवलीत जागोजागी झाडांची पडझड, घराचे पत्रे उडुन घराचे नुकसान  Reviewed by News1 Marathi on May 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads