Header AD

भाजप माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील यांच्या प्रयत्नाने सागाँव - सागर्ली भागातील पाणी प्रश्न सुटणारडोंबिवली ( शंकर जाधव ) सागाँव- सागर्ली येथीलसागावेश्वर मंदिर जवळ २० हजार दशलक्ष पाणी साठवणूक क्षमता असणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.कोरोनाचे संकट पाहता यावेळी मोजक्याच कार्यकर्त्यांनासह हा कार्यक्रम पार पडला.    यावेळी भाजप माजी नगरसेविका डॉ.सुनीता पाटील,नामदेव पाटील, सुहासिनी राणे,जनार्दन भोईर,भाऊ ठाकूरप्रफुल पठारे,ऋषिकेश देशमुखउमेश भंडारे,वसंत सुखदरेछाया कांबळे,दिलीप पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.माजी भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता मागील अनेक वर्षांपासून माजी नगरसेविका डॉ.पाटील ह्यामहानगरपालिकडे पाठपुरावा करत होत्या. माजी नगरसेविका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.        पुढील वर्षभरात प्रभागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी निघेल असे यावेळी डॉ.सुनीता पाटील यांनी यावेळी सांगितले.तसेच अमृत योजना अंतर्गत व कल्याण डोंबिवली(मुंबई महानगर प्रदेश) मध्ये अनेक काम मंजूर करवून घेउन बरीच कामे जलद गतीने होत आहेत. बरीचशी प्रगती पथावर आहेत त्याबद्दल माजी नगसेविका डॉ. पाटील पालकमंत्री एकनाथजी शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले.

भाजप माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील यांच्या प्रयत्नाने सागाँव - सागर्ली भागातील पाणी प्रश्न सुटणार भाजप माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील यांच्या प्रयत्नाने सागाँव -  सागर्ली भागातील पाणी प्रश्न सुटणार Reviewed by News1 Marathi on May 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads