Header AD

कोरोना जन जागृती साठी आगरी धवला पारंपारिक बोलीभाषेतून गावकऱ्यांमध्ये जन जागृती

 कल्याण , कुणाल  म्हात्रे :  कोरोनाच्या महामारीत ग्रामीण भागात तसेच शहरीभागात जनजागृती व्हावीशासनाने घातलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन प्रत्येक नागरिकाने करावेगर्दीत जाऊ नयेसातत्याने साबणाने हात धुवावेतसँनीटायझरचा वापर करावासण समारंभामध्ये एकत्र जमू नयेसोशल डिस्टंसिंगचा वापर करावाएकामेकाच्या घरी जाऊ नये. अशा पद्धतीचे मार्गदर्शन ग्रामीण आणि शहरी जनतेला व्हावे यासाठी हा आगरी धवला तयार करण्यात आला आहे.  


आगरी समाजातील लग्न समारंभातील पारंपरिक धवला हा लोकप्रिय प्रकार प्रचलित आहे. त्याचाच वापर करून कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील भाल गावातील कांताबाई लहू मढवी यांनी कोरोना हटाव हा धवला सादर केला आहे.  याची संकल्पना,दिग्दर्शन आणि छायाचित्रण अजय पाटील यांची असून लक्ष्मी चित्र या यूट्यूब चँनलवर तो प्रसारित करण्यात आला आहे. याला संगीत आणि कला जीवन मढवी यांनी केले आहे. हा आगरी धवला चांगल्याप्रकारे कोरोना विषयी जनजागृतीचे काम करत आहे. या कामी लहू मढवी यांनी मदत केलेली आहे.


ठाणे जिल्ह्यात आगरी समाज मोठ्या प्रमाणावर राहत असून ग्रामीण भागामध्ये लोकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने आगरी धवला तयार केल्याचे अजय पाटील यांनी सांगितले. अजय पाटील हे भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे शिक्षक आहेत. कोरोना विषयी जनजागृतीसाठी आगरी धवल्याचा वापर करावा ही संकल्पना सुचल्याने अंबरनाथ तालुक्यातील भाल गावातील कांताबाई लहू मढवी यांनी गायलेला धवला त्यांच्या राहत्या घरीच शूट करण्यात आला असेही पाटील यांनी सांगितले.

      
             तर माझी आई लग्न कार्यात धवला गाते त्याचाच वापर करून कोरोना आजारावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याचे वर्णन आईने केल्याचा सार्थ अभिमान आहे असे जीवन मढवी यांनी सांगितले.

कोरोना जन जागृती साठी आगरी धवला पारंपारिक बोलीभाषेतून गावकऱ्यांमध्ये जन जागृती कोरोना जन जागृती साठी  आगरी धवला पारंपारिक बोलीभाषेतून गावकऱ्यांमध्ये जन जागृती  Reviewed by News1 Marathi on May 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads