Header AD

नाका कामगारांना धान्याचे किट वाटप

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोरोना महामारीची दुसरी लाट आली असून कोरोनाचा हा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने लॉकडाऊन लागु करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये गरीब गरजू कुटुंबातील कोणीही उपाशी राहू नये यासाठी तिरुपती केटरर्स आणि स्वामी नारायण हॉलचे मालक दिनेश ठक्कर ह्यांनी मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांच्या सहकाऱ्याने आरएसपी युनिट कमांडर मणिलाल शिंपी यांच्या मदतीने नाका कामगारांना  अन्नधान्याचे वितरण करण्यात आले.     


कोरोंना काळात करण्यात आलेल्या लोकडाऊनमुळे सामान्य नगरिकान अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्यांसाह नाका कामगार ही भरडला गेला आहे. कामाच्या शोधत शहराच्या नाक्यावर कामगार पहाटेपासून बसून असतात. काम मिळाला तर पोत पैसे मिळतील आणि कुटुंबाचे पोट भरता येईल. मात्र लॉकडाऊनमध्ये यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये महणून त्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. कल्याणतील गोविंदवाडी जवळील संत सेवलाल बांजरा नगर तसेच इतर ठिकाणी नाक कामगाराना भेट देत वाटप करण्यात आले.  


अन्नधान्य वितरणा दरम्यान मास्क घालूनसॅनिटायझर्स वापरुन स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली. गरिबांना खायला देण्याव्यतिरिक्त स्वयंसेवी संस्था इतर विविध विषयांवर लक्ष केंद्रित करते. अन्न वाटपाला मिळालेला प्रतिसाद अप्रतिम होता. संस्थेने केलेल्या मदतीमुळे बरेच लोक रिकाम्या पोटी झोपणार नाहीत.


नाका कामगारांना धान्याचे किट वाटप नाका कामगारांना धान्याचे किट वाटप  Reviewed by News1 Marathi on May 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील र...

Post AD

home ads