Header AD

डोंबिवलीच्या बंद कंपनीतील आवारात ५८० बेडच्या कोविड सेंटरला न्यायालयाची मान्यता

 

■खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्या यश कोपर पुल दुरुस्तीच्या शेवटच्या टप्प्याचे काम  २ मे रात्री पासून सुरू....


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कोपरचा पूल लवकरात लवकर सुरु करणे आणि डोंबिवली एमआयडीसी पेंढारकर कॉलेज मागील विभा कंपनी मधील आवारात नव्याने उभारण्यात येणारे भव्य कोविड सेंटर सुरु करावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून नागरिकां कडून केली जात होती. कल्याण लोकसभा मतदार संघाचे  खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आता लवकरच या दोन्ही गोष्टी मार्गी लागणार आहे.


पेंढारकर कॉलेजच्या मागील डोंबिवली एमआयडीसीतील विभा नावाची इंजिनियर अनेक वर्ष काही अंतर्गत न्यायालय बाबींमुळे बंद पडली होती. या कंपनीचे आवार खूप मोठे आहे. तसेच २  मजल्याचे बांधकाम असलेल्या तीन मोठ्या इमारती या आवारात आहेतअत्यंत कमी खर्चात येथे मोठेजास्तीत जास्त रुग्णांची व्यवस्था करता येईल असे सुटसुटीत कोविड सेंटरडॉक्टर व इतर सर्व कर्मचाऱ्यांची व्यवस्था अशा सर्व एकाच ठिकाणी करता येईल अशी व्यवस्था या कंपनीच्या आवारात आहे. त्यामुळे महापालिकेचा पैसा यातून वाचणार आहे.

 

काही न्यायालयीन बाब असल्यामुळे या कंपनीला कोविड सेंटर बनवण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. परंतु आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे  आणि महानगरपालिका यांच्या प्रयत्नाने न्यायालयाची परवानगी आल्यामुळे हे काम लवकरच मार्गी लागणार आहे. तसेच कोपर पुलाच्या शेवटच्या टप्प्यातील दुरुस्तीचे  वेल्डिंगचे काम ऑक्सिजन तुटवड्यामुळे थांबले होते ते सुद्धा मार्गी लागले असून आज २ मे  रात्री पासून तिसऱ्या व शेवटच्या गर्डर लॉन्चिंगचे काम सुरू होणार आहे व पूल पूर्णत्वास येण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे.


डोंबिवलीच्या बंद कंपनीतील आवारात ५८० बेडच्या कोविड सेंटरला न्यायालयाची मान्यता डोंबिवलीच्या बंद कंपनीतील आवारात ५८० बेडच्या कोविड सेंटरला न्यायालयाची मान्यता Reviewed by News1 Marathi on May 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads