Header AD

कोकणात भटके विमुक्त समाज शासकीय मदती पासून वंचित समाजास आवश्यक ती मदत करू – माजी आमदार नरेंद्र पवार
कल्याण, कुणाल म्हात्रे  : काही दिवसांपूर्वी कोकणामध्ये तौक्ते चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये शेतकरी वर्ग, व्यवसायिक वर्ग सर्वांचेच नुकसान झालं आहे. त्याचप्रमाणे भटक्या समाजाचे सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा समाज शासकीय मदतीपासून वंचित आहे. कोकणातील पाड्यांवर मोठ्या प्रमाणात भटका समाज राहत आहेत. काही लोकांचे घरे या चक्रीवादळाने पडले असून त्यांना मदत करु व सर्वांनी काळजी घ्यावी असे आव्हान भाजपा प्रदेश संयोजक भटके विमुक्त माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ऑनलाइन मीटिंग द्वारे केले.


यावेळी राष्ट्रीय भटके-विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी बोलताना महाराष्ट्र मध्ये भटके विमुक्त आघाडीची वाटचाल ही नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरू आहे असं मत व्यक्त केले. मार्गदर्शन करताना भटके समाजास रस्त्यावर राहण्याचा व उदरनिर्वाह करण्यासाठी भटक्या समाजाला प्रचंड प्रमाणात संघर्ष करावा लागतो. मागच्या वर्षी कोरोना काळात भटक्या समाजाकडे राहण्याची व जेवणाची पण व्यवस्था नव्हती. यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सेवा भारतीच्या माध्यमातून भटके कल्याण परिषद हरियाणामधील कल्याण समाज या संस्थेच्या माध्यमातून देशभरात अडकलेल्या भटक्या समाजाला मदत करुन त्यांना दोन कोटी भटक्या समाजाच्या लोकांची खाण्याची व्यवस्था केली.


 महाराष्ट्रामध्ये भटक्या समाजाचा राजकीय अस्तित्व धोक्यात असून त्याला योग्य दिशा भेटणे महत्त्वाचं  आहे. महाराष्ट्रात समाजासाठी एक हजार आश्रम शाळा आहेत. गुजरात मध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये भटक्या समाजासाठी ३ लाख घर बांधून भटक्या समाजाला हक्काचा निवारा दिला आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणअन्नवस्त्रनिवारा यासाठी भाजप भटके विमुक्त आघाडीने जनजागृती केली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले.

कोकणात भटके विमुक्त समाज शासकीय मदती पासून वंचित समाजास आवश्यक ती मदत करू – माजी आमदार नरेंद्र पवार कोकणात भटके विमुक्त समाज शासकीय मदती पासून वंचित समाजास आवश्यक ती मदत करू – माजी आमदार नरेंद्र पवार Reviewed by News1 Marathi on May 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads