Header AD

गरजू नागरिकांना रेशनचे वाटप होपमिरर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोना विषाणुचा  प्रादुर्भाव रोखण्या साठी सध्या राज्यात  पुन्हा  लॉकडाऊन सुरु आहे. अशातच या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी  सर्व उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतले असून त्यामुळे  समाजातील गोरगरीबनिर्वासिततळहातावर कमवणाऱे मजुर,  बेघर असलेल्या कुटूंबाना  नवी मुंबई मधील होपमिरर फाउंडेशन संस्थेच्या वतीने अमृतनगरकौसामुंब्रा येथील  गरीब आणि गरजूंना रेशनचे   वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. 


या उपक्रमामुळे बरेच नागरीक  उपाशी  पोटी झोप घेणार नाहीत. प्रत्येकाने आपल्याला दिलेला पाठिंबा खूप आहे आणि आम्ही अजूनही गरजू नागरिकांना मदत करत राहू.   होपमिरर फाउंडेशनने निश्चितपणे एक सामाजिक कामाचा उदाहरण डोळ्यासमोर उभे केले आहे.  हे पुढाकार समाजात क्रांतिकारक बदल घडवून आणू शकतात आणि आपण दिलेल्या पाठिंब्याचे देखील स्वागत करतात कारण प्रत्येक प्रयत्नांना महत्त्व असते असे  होपमिरर फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष  रमझान शेख यांनी बोलतांना सांगितले. तर  यावेळी संपूर्ण टीम व  स्वयंसेवक आणि देणगीदारांचे आभार व्यक्त करण्यात आले.


गरजू नागरिकांना रेशनचे वाटप होपमिरर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम गरजू नागरिकांना रेशनचे वाटप होपमिरर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम Reviewed by News1 Marathi on May 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads