Header AD

कल्याणच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ

 

■नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना मनस्ताप सकाळी ५ वाजता टोकन घेऊनही नंबर न आल्याने नागरिकांचा राडा....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आज पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले असून आज या लसीकरणाच्या पहिल्या दिवशीच कल्याणमध्ये लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ पाहायला मिळाला. केडीएमसीच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. लस मिळेल या आशेने नागरिकांनी सकाळी ५ वाजेपासून लाईन लावत टोकन घेतले. मात्र तरीही लस न मिळाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी राडा  घातला.


राज्यासह देशभरात आजपासून १८  ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु झालंय  पण लसंच नसल्या कारणामुळे आता प्रशासन हतबल झालंय. दुसरीकडे लसींसाठी तब्बल सहा ते आठ तास रांगेत उभं राहून नागरिकांना लसी मिळत नाहीयत. त्यामुळे हताश झालेल्या नागरिकांकडून आता संताप व्यक्त केला जातोय. कल्याणच्या लसीकरण केंद्रावर अशीच घटना घडली. लसीसाठी टोकण घेऊन सहा ते आठ तास रांगेत उभं राहून लसी मिळाल्या नाहीत म्हणून नागरिकांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर आकांडतांडव केला.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात फक्त एकाच ठिकाणी कल्याण पश्चिमेतील लाल चौकी येथील आर्ट गॅलरी येथे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरु आहे. त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. महापालिकेकडे २०० जणांनी रजिस्ट्रेशन केले. मात्र रजिस्ट्रेशन केलेले फक्त आठ जण लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी पोहचले.


 तर ऑनलाईन स्लॉट बुक केलेल्या नागरिकांना देखील सर्वर डाऊन असल्यामुळे बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले.  अनेक नागरीक आज पहाटे पाच वाजल्यापासून आर्ट गॅलरी येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी रांग लावून बसले होते. रजिस्ट्रेशन केलेले नागरीक लसीकरणासाठी कमी प्रमाणात आल्याने आम्हाला लस द्यावीअशी मागणी रांगेत उभे असलेल्या नागरीकांनी केली. त्यावेळी नागरीकाना टोकण देण्यात आले.


टोकन  दिलेल्या नागरीकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन असलेल्यांनाच लस दिली जाईलअसे दुपारी सांगण्यात आले. त्यामुळे आम्हाला टोकण कशाला दिलेजर लस द्यायची नाही तर आधीच सांगितले पाहिजे होते नाअसा संतप्त सवाल त्यांनी केला. यावेळी केडीएमसीच्या उपायुक्त पल्लवी भागवतकेडीएमसीचे आरोग्य अधिकारी संदीप निंबाळकर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पोलिसांनी मध्यस्थी करत परस्थिती नियंत्रणात आणली. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळेच लसीकरण केंद्रावर नागरीकांचा हा गोंधळ उडाला.


कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत खाजगी आणि सरकारी लसीकरण केंद्रावर तीन महिन्यांपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापासून लसीकरणास सुरुवारत करण्यात आली होती. त्यानंतर केंद्राकडून राज्याला लसीचा पुरवठा कमी करण्यात येत असल्याने लसींचा साठा कमी पडू लागला. 


त्याचा फटका कल्याण डोंबिवलीतील लसीकरणासही बसला आहे. याआधी ४५ वर्षे वय असलेल्यांना लसीकरण दिले जात होते. १  मे पासून १८  ते ४४  या वयोगटातील नागरीकांचे लसीकरण केले जाईलअसे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले. मात्र पुरेशा लसी उपलब्ध नसल्याने सर्व लसीकरण केंद्राचे लसीकरण बंद पडलं.

कल्याणच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ कल्याणच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ Reviewed by News1 Marathi on May 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads