Header AD

मीरा - भाईंदर महापालिकेच्या अखत्यारी तील तीन कोविड सेंटरमधील 300 अतिरिक्त बेडसच्या सुविधेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण


मीरा-भाईंदर पालिकेला ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न सोडवून ऑक्सिजन बेडस वाढवण्याची सूचना....


मीरा भाईंदर, प्रतिनिधी  :-  मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील तपोवन हायस्कूल, पदमश्री आप्पासाहेब धर्माधिकारी हॉल आणि उत्तन- चौक गावातील शाळेतील कोविड केअर सेंटरमधील एकूण 300 अतिरिक्त  बेडसच्या सुविधेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलं. याशिवाय शहरातील नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लँटला देखील श्री. शिंदे यांनी भेट दिली. 


          मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील तीन कोविड केंद्रांमधील वाढीव बेडसचे लोकार्पण करून या सुविधेची पाहणी श्री. शिंदे यांनी केली. तसच महापालिकेच्या माध्यमातून उभ्या रहात असलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटला देखील त्यानी भेट दिली. 


        यानंतर पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकीत या महानगरपालिकेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी रुग्णाच्या सुविधेसाठी बेडस वाढवून देण्यात आले असले तरीही पालिकेच्या अखत्यारीतील 100 आणि खाजगी रुग्णालयातील 200 असे सुमारे 300 बेडस ऑक्सिजन अभावी वापरता येत नसल्याचे वास्तव त्यांच्या समोर आले. यावर तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर मंजूर केलेले 2 ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित करणे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यावर भर देणे आणि ऑक्सिजन कॅन्सट्रेटरच्या माध्यमातून लोकांना तातडीची मदत करण्याचे उपाय श्री शिंदे यांनी आयुक्तांना सुचवले. 


          त्यासोबतच ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा गैरवापर टाळण्याकडे विशेष लक्ष द्यावे, शहरातील सर्व रुग्णालयाचे फायर, ऑक्सिजन आणि स्ट्रक्चरल ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करून घेणे आणि खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन मॉनिटरिंग करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त किंवा वॉर्ड ऑफिसरची नियुक्ती करणे अशा काही सुचनाही केल्या. 


       याशिवाय कोविड केंद्रातील वातावरण चांगलं ठेवण्यासाठी कौन्सिलिंग, योगा, संगीत आशा थेरपीजची मदत घेण्याच सुचवलं.  ज्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी खाली आली आहे अशा रुग्णाना पालथं झोपवून ती काही अंशी वाढते का..? यासाठी प्रयत्न करणे, रुग्णांसोबत डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्याचे मनोबल उंचावण्यासाठी जास्त वेळ काम करणार्यांना अतिरिक्त मोबदला देण्याचा विचार करण्याची सूचना देखील पालकमंत्री शिंदे यांनी केली. 


           महापालिकेचे काही प्रश्न निधीअभावी रखडले असले तरीही नगरविकास विभागाकडून 5 कोटी तर एमएसआरडीसी कडून अडीच कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. याशिवाय डीपीडिसी आणि एसडीआरएफच्या माध्यमातून लवकरात लवकर निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वसन त्यांनी दिले. असं असलं तरीही निधीअभावी कोणतंही काम रखडणार नाही याची दक्षता घेऊ अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. 


            या बैठकीला खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन,   विधान परिषदेतील आमदार रवींद्र फाटक, मीरा भाईंदरचे आयुक्त दिलीप ढोले आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

मीरा - भाईंदर महापालिकेच्या अखत्यारी तील तीन कोविड सेंटरमधील 300 अतिरिक्त बेडसच्या सुविधेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण मीरा - भाईंदर महापालिकेच्या अखत्यारी तील तीन कोविड सेंटरमधील 300 अतिरिक्त बेडसच्या सुविधेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण Reviewed by News1 Marathi on May 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads