Header AD

भिवंडीत कोविड- १९ च्या अनुषंगाने RT-PCR चे बनावट रिपोर्ट तयार करून विकणाऱ्या भिवंडीतील पॅथॉलॉजीचा पर्दापाश करून लॅब मालकासह टोळीस पोलिसांनी केली अटक..
भिवंडी दि 22  (प्रतिनिधी ) शहरातील शांतीनगर, गैबीनगर परिसरात लोकांची RT PCR Test न करता कोवीड- १९ साथीच्या आजाराचे निगेटीक तसेच पॉझीटीव्ह बनावट रिपोर्ट ५००/- रु. दराने दिला जातो अशी खबर गुन्हे शाखेला मिळाली असता  खातरजमा करणेकामी गुन्हे शाखाचे वपोनि  अशोक होनमाने व इतर पोलीस अधिकारी  अमलदार सोबत भिवंडी मनपाचे वैदयकिय अधिकारी व शासकीय पंच असे एकत्र येवुन गैबीनगर, पिराणीपाडा, अमजदीया शाळेसमोरील महेफुज पॅथॉलॉजीकल लॅबो येथे पोलीसांनी डमी व्यक्ती कोबीड-१९ चे निगेटीव्ह रिपोर्ट घेण्याकामी पाठविले असता RT-PCR Test  कोणताही स्टॅब अथवा सॅम्पल न घेता कोवीड- १९ चा  निगेटीव्ह रिपोर्ट वायरोकेअर या नामांकित लंबच्या लेटरहेड  वापर करून बनावट रिपोर्ट देताना महेफुज  लॅबरोटरी मधील ३ इसमांना रंगेहात पकडले.                   सदर महफुज क्लीनीकल लॅबरॉटरीची झडती घेतली असता कोवीड-१९ या साथीच्या आजाराचे RT-PO तपासणी केलेल्या वेगवेगळ्या एकूण ६४ इसमांचे रिपोर्ट मिळून आले. त्यामध्ये ५९ रिपोर्ट हे निगेटीव्ह  व ५ रिपोर्ट  हे पॉझीटीव्ह मिळून आले. सदर बाबत लॅब टेक्नीशियन १) इनामुलहक उर्फ रब्बानी आणि लॅबचे मॅनेजमेंटचे काम  पाहणारा २) आफताब आलम मुजीबुल्ला खान यांचे कडे बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी सदरचे इसमांचे कोवीड-१९ RT-PCR तपासणी रिपोर्ट हे लॅब मध्ये मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, संगणक, प्रिंटर सहाय्याने बनावट तयार केलेले असल्याची कबुली दिली.                     त्यांच्या कडे अधिक कसुन विचारपुस केली असता माहीती मिळाली की, भिवंडी शहरातुन परराज्यामध्ये जाण्यासाठी विमानाने रेल्वेने प्रवास करण्याकरीता आणि कंपनीमध्ये काम करणाच्या कामगारांना कोवीड-१९ या साथीच्या आजाराचा RT PCR तपासणी रिपोर्ट हा निगेटीव्ह असणे बंधनकारक असल्याने सदर इसमांना प्रत्येक रिपोर्ट हा कमीत कमी ५००/- रू. एवढ्या दराने बनावट थायरोकेअर या पॅथॉलॉजीच्या लेटरहेडवर तयार केलेले आहेत. तसेच, यापूर्वी सुध्दा अनेक लोकांना बनावट बनवुन दिलेले आहेत. सदरचे सर्व रिपोर्ट हे मेहफुज क्लीनिकल लॅबरोटरीचे मालक मेहफुज आलम मुजीबुल्ला याच्या सांगण्यानुसार तयार केलेले व लोकांना दिलेले आहेत.                 त्यावरून सदर बाबत शांतीनगर पोलीस भिवंडी येथे गु.रजि.नं. २३६/२०२१ कलम ४२०,४६५,४६८, ४७९,२६९,२७०, ३४ सह कोवीड उपाययोजना सन् २०२० नियम ११ प्रमाणे साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ चे कलम २, ३, ४ प्रमाण दि. २१/०४/२१ रोजी दाखल केला आहे. सदर गुन्हयात आरोपी नामे १) इनामुलहक उर्फ रब्बनी अनवान सैयद वय ३१ रा. भिवंडी २) अफताब आलम मुजीबुल्ला खान वय २२ रा पिराणीपाडा, भिवंडी, ३) मोहम्मद शारीक मोहम्मद साबीर शेख वय २० वर्षे रा. शांतीनगर, भिवंडी यांना   अटक करण्यात आलेली असून त्यांना ३० एप्रिल पर्यंत  पोलीस कोठडी  सुनावण्यात  आली आहे.


  
                      तर   . ४) मेहफूज आलम मुजीबुल्ला खान वय २९ वर्षे रा. भिवंडी यास आज  अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाच्या तपासात सदर लॅबमधुन कोबीड-१९ RT-PCR तपासणीचे ६४ रिपोर्ट, त्याचप्रमाण आरोपींनी पडघा परिसरातील कोशींबी येथील साईधाम कम्पांऊड मधील वेगवेगळया कंपन्यामध्ये काम करणाऱ्या  कामगारांचे RT-PCR तपासणीसाठी घेतलेले एकूण ५८९ स्वब, ४३० आधारकार्डच्या झेरॉक्स, ५६९ आय.सी.ए आर.चे फॉर्म हे लॅबमध्ये मिळून आलेले आहेत.                 तसेच यापुर्वी अनेक कंपन्यातील मोठ्या प्रमाणात कामगारांचे RTI PCR तपासणीचे बनावट रिपोर्ट तयार करून विकी केलेले आहेत असे निष्पन्न झालेले आहे. त्याबाबत अधिक  तपास पोउपनि शरद बरकडे करीत आहेत.त्याप्रमाणे गुन्हयाच्या तपासात भिवंडी मनपा यांच्याकडून माहीती घेतली असता सदर मेहफुज क्लीनिक लॅबोरेटरी यांना आय.सी.एम. आर. कडुन किंवा शासनाकडुन कोवीड –१९ या साथीच्या आजाराबाबत RT PC तपासणी करण्याची कोणत्याही प्रकाराची परवानगी दिलेली नसल्याचे कळविलेले आहे.


             सदर  कामगिरी ही ठाणे  पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर,  पोलीस सह आयुक्त डॉ.सु मेकला,  अपर पोलीस आयुक्त, गुन्हे  संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे  लक्ष्मीकांत पाटील  व  सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शोध–१, ठाणे  किसन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा यु २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अशोक होनमाने यांचे देखरेखीखाली सपोनि  महेंद्र जाधव पोउपनि . शरद बरकडे, व सपोउपनि मन्सुरी, पोहवा  रविंद्र पाटील, पोहवा  सुधाकर चौधरी, पोहवा  जाधव, मपोहवा  मेघना कुंभार, मपोहवा  निता पाटील, पोहवा   अरूण पाटिल  पोना  सचिन जाधव, पोना प्रमोद धाडवे, पोना राजेंद्र सांबरे, पोना  अनिल पाटिल, पोना भावेश घरत, पोना रंगनाथ पाटील, पोशि वसंत गवारे, चापोशि   सांळुखे यांनी केलेली आहे...
भिवंडीत कोविड- १९ च्या अनुषंगाने RT-PCR चे बनावट रिपोर्ट तयार करून विकणाऱ्या भिवंडीतील पॅथॉलॉजीचा पर्दापाश करून लॅब मालकासह टोळीस पोलिसांनी केली अटक.. भिवंडीत कोविड- १९ च्या अनुषंगाने RT-PCR चे बनावट रिपोर्ट तयार करून विकणाऱ्या भिवंडीतील पॅथॉलॉजीचा  पर्दापाश करून लॅब मालकासह टोळीस पोलिसांनी केली  अटक.. Reviewed by News1 Marathi on April 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads