Header AD

भिवंडी वाहतूक पोलिसां कडून रिक्षा चालकांची अँटिजेन तपासणी

 



भिवंडी दि. १७ (प्रतिनिधी  )  कोरोनाचा धोका वाढत असल्याने सध्या राज्यासह शहरात लॉक डाऊन करण्यात आला आहे . मात्र अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहतुकी बरोबरच प्रवासी रिक्षा चालकांना नियम अटींचा पालन करून रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरात अनेक रिक्षा सध्या रस्त्यांवर प्रवासी वाहतूक करीत असल्याने या रिक्षा चालकांना कोरोना अँटिजेन चाचणी करणे आवश्यक आहे.



               मात्र तपासणी केंद्रांवर असलेल्या लांब रांगांमुळे रिक्षा चालकांना कोरोना तपासणी करता येत नसल्याने भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मायने यांच्या वतीने शनिवार कल्याण नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालय परिसरात शहरातील रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिरात १०० रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक मायने यांनी दिली आहे. 
भिवंडी वाहतूक पोलिसां कडून रिक्षा चालकांची अँटिजेन तपासणी भिवंडी वाहतूक पोलिसां कडून रिक्षा चालकांची अँटिजेन तपासणी Reviewed by News1 Marathi on April 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads