Header AD

नियमांचे उल्लंघन करणारी दुकाने केडीएमसीने केली सील

 


कल्याण , प्रतिनिधी  : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही अत्यावश्यक सेवेतील बाबी वगळून इतर सर्व आस्थापना ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आले आहेत. 


            या आदेशाच्या अनुषंगाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आज आय प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक‍ शिंदे यांनी चिंचपाडा रोड येथील १ इलेक्ट्रॉनिक्स दुकान व कपडयाचे गोडाऊन सील केले. फ प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पाटील यांनी ९० फिट रोड लगतचे सुरु असलेले  गादीचे दुकान व चोळेगांव ठाकुर्ली येथील १ गादीचे दुकान आज सील केले. महापालिकेच्या नागरिकांनी नियमांचे पालन करुन महापालिकेस सहकार्य करावेअसे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आलेआहे.

नियमांचे उल्लंघन करणारी दुकाने केडीएमसीने केली सील नियमांचे उल्लंघन करणारी दुकाने केडीएमसीने केली सील Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads