Header AD

गरजूंना अन्नधान्य आणि कपडे, मास्क यांचे वाटप

 

■टीम परिवर्तन आणि धनगर सेवा संघ यांचा एकत्रित उपक्रम...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  टीम परिवर्तन ही सामाजिक संस्था कोरोनाच्या संकटकाळात सातत्याने गरजु आणि वंचित लोकांना वेळोवेळी अन्नधान्य त्याचबरोबर कपडेमास्क यांचे वाटप करत आहे. नुकतेच संस्थेने धनगर सेवा संघ मलबारहिल यांच्या मदतीने नेपेन्सी रोड परिसरातील रस्त्यावर राहणाऱ्या २५ लोकांना राशन किटचे वाटप केले. त्याचबरोबर १०० पेक्षा अधिक लोकांना खिचडी आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले.


या उपक्रमात संजय जागळेंमालोजी बोडकेशोभा बोडकेहर्षद फुलेराहुल कोकरेमिहीर भावदाणेसंदीप जांगळीसुरज चौरसिया यांनी सहभाग घेतला. टीम परिवर्तन या संस्थेचे सदस्य मुंबईत विविध शहरांत वंचित घटकांसाठी काम करत आहेत त्यांच्या या कामांत अनेक लोकांनी आपले योगदान दिले आहे. यापुढेही आम्हीं शक्य ते प्रयत्न करून लोकांना किमान अन्नधान्य पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे संस्थेचे तुषार वारंग यांनी यावेळीं कळवले. नागरिकांनी आपल्या परिसरात असलेल्या वंचित लोकांना आपल्या पध्दतीने मदत करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळीं केले.

गरजूंना अन्नधान्य आणि कपडे, मास्क यांचे वाटप गरजूंना अन्नधान्य आणि कपडे, मास्क यांचे वाटप Reviewed by News1 Marathi on April 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads