Header AD

सामाजिक बांधलिकीच्या जाणीवेतुन कोविड हॅास्पीटल साठी स्वखर्चाने दिले १० बेड
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महाराष्ट्रात कोरोना दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू असुन दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रूग्ण संख्येचा आलेख पाहता हँस्पिटल मध्ये बेडची कमतरता भासत आहे.                          


कल्याण पूर्वत राहणारे सामाजिक बांधलिकीचा वसा जपणारे विजय भोसले यांच्या पत्नी उज्वला भोसले  यांचा  कोरोना रिपोर्ट कोवीड पोझीटीव्ह आल्याने त्यांना मनपाच्या टाटा आमंत्रण येथे ठेवण्यात आले होतेसदर ठिकाणाची कोरोना संशयित रूग्णांची व्यवस्था प्रशासनाने दर्जेदार देत  अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू असुन यामध्येदोन वेळ जेवण,नाष्टातसेच वेळोवेळी मागणी नुसार औषध पण मिळाली होती. उपचाराअंती सहा दिवसानंतर उज्ज्वला घरी आल्या नंतरत्यांची तब्येत उत्तम आहे.

   

               या घटनेतुन विजय भोसले यांनी असा विचार केला की कल्याण डोंबिवली महापालिका एवढ्या चांगल्या सुविधा देत असतानालोक खाजगी दवाखान्यात का धाव घेतात खाजगी दवाखान्यात १ लाख ते २ लाख बील भरतात.  माझी पत्नी जर खाजगी दवाखान्यात असती तर कमीत कमी १ लाख रु तरी बिल झाले असते, त्यामुळे  विजय भोसले यांनी असा विचार केला १ लाख रु वाचले आहेत  माणुसकीच्या भावनेतून महापालिका एवढी चांगली सुविधा देते,तर आपणही सामाजिक बांधलिकीच्या माध्यमातून कोरोना लढाई साठी हातभार  लागावा म्हणून  विजय भोसले यांनी डोंबिवली जिमखाना कोवीड सेंटरच्या प्रशासकीय अधिकारी रोहिणी लोकरे यांना संपर्क करून मदतीबाबत विचारले असता त्यांनी जिमखाना कोवीड सेंटरला १० बेड ची आवश्यकता आहे असे सांगितले.

          

                    तातडीने विजय भोसले यांनी त्यांच्या सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने जिमखाना कोवीड सेंटरला १० बेड देऊ इच्छितो असे पत्र क.डो.म.पा. आयुक्तांना देत आयुक्तांच्या परवानगीने १२ एप्रिल रोजी डोंबिवली जिमखाना कोविड हॅास्पीटलसाठी १० लोखंडी बेड्स१० फोम च्या गाद्या आणि १० ऊशा   सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने सुपूर्द केल्या. याप्रसंगी ओम साई हेल्थ केअरचे सीईओ साहिलरोटरी क्लब कल्याण पूर्वचे संदिप चौधरी कडोमपा ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष प्रविण भोसलेकालीदास कदमत्याचप्रमाणे माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के  आणि हॅास्पीटलचे डाँक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.


कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डाँ. विजय सूर्यवंशी यांनी सहयोग सामाजिक संस्थेचे काम अभिनंदनीय आहे असे कळवित कामाचा गौरव केला. तर आमदार रविद्र चव्हाण यांनी देखिल ह्या उपक्रमाचे कौतूक केले. ओम साई हेल्थ केअरचे सीईओ साहिल यांनी वाढीव बेडमुळे कोरोना संशयित रुग्णांना दिलासा मिळेल असे सांगितले.

सामाजिक बांधलिकीच्या जाणीवेतुन कोविड हॅास्पीटल साठी स्वखर्चाने दिले १० बेड सामाजिक बांधलिकीच्या जाणीवेतुन कोविड हॅास्पीटल साठी स्वखर्चाने दिले १० बेड Reviewed by News1 Marathi on April 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads