Header AD

विरोधी पक्षनेते शानू पठाण सकाळी ६-३० पोहचले नवी मुंबईत ऑक्सिजन कंपनीत


■मुंब्रा -कौसा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा - विरोधी पक्षनेत्यांनी वाचविले अनेकांचे प्राण....


●ऑक्सिजनचा  पुरवठ्यासाठी पालिका अधिकाऱ्यांचा समन्वय अपुरा....

 


ठाणे , प्रतिनिधी  ;  ठाणे पालिकेच्या अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा अभाव जाणवल्यानंतर मुंब्रा-कौसा येथील अनेक रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने एकच खळबळ उडाली. सदरची तक्रार विरोधी पक्षनेते शानू  पठाण यांच्याकडे केली. ऑक्सिजनचा पुरवठा मिळवण्यासाठी थेट विरोधी पक्ष नेते शनिवारी नवी मुंबईच्या ऑक्सिजन उत्पादन करण्याऱ्या रबाळे येथील संतारामदास कंपनीत पोचले आणि रुग्णालयाला ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. विरोधी पक्षनेते यांच्या तत्परतेने अनेक रुग्णांचे जीव वाचले. सध्या एका दिवसाचा ऑक्सिजनचा पुरवठा आहे. तर पालिका अधिकारी यांचा ऑक्सिजन पुरवठादार कंपनीशी समन्वय संपर्काचा अभाव असल्याची खंत पठाण यांनी व्यक्त केली. 


                 मुंब्रा-कौसा परिसरात असलेल्या अनेक खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा होता. यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला. मुंब्रा कौसा परिसरातील रुग्णालयाचा ऑक्सिजन संपला. तेव्हा रात्री मंत्री महोदय डॉ.  जितेंद्र आव्हाड यांनी अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी संपर्क साधून ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. तात्पुरती ऑक्सिजनची  सुविधा मिळाली पण नंतर काय?


              म्हणून बिलाल रुग्णालयाचे संचालक निझाम यांनी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना संपर्क करून विनंती केली. नवीमुंबई रबाळे परिसरातील संतारामदास या ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपनीने ऑक्सिजन देण्यास नकार दिला. दरम्यान विरोधी पक्षनेते यांनी शनिवारी सकाळी ६-३० वाजण्याच्या सुमारास नवीमुंबईतील संतारामदास कंपनीत धडक दिली त्यांच्या सोबत रिहान पितलवाला, साकीब  दाते, हकीम शेख या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, कंपनीच्या वरिष्ठांशी  समन्वय साधून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिला. 


             दरम्यान मुंब्रा-कौसा परिसरातील बिलाल रुग्णालयाला एक दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. मात्र अन्य रुग्णालये मदरवुड रुग्णालय, रहमानिया रुग्णालय यांनाही ऑक्सिजनची गरज असून त्यांनी विरोधी पक्षनेते याना साकडे घातले आहे. सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयाला ऑक्सिजनचा अपुरा होणारा  पुरवठा यामुळे भविष्यात कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. 


           केंद्र सरकार, राज्यसरकार आणि पालिका अधिकारी यांची समन्वय समिती बनवून  काम करणे गरजेचे आहे. पालिका अधिकारी यांना ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्याची माहिती असणे गरजेचे आहे. ऑक्सिजन पुरवठा रुग्णालयाला होणे गरजेचे आहे. यात अपयश आल्यास आपल्याला कब्रस्तान आणि स्मशान कमी पडतील अशी गंभीर परिस्थिती निर्माण होईल अशी भीतीही विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी व्यक्त केली.  


---------------------------------------------------------------------------

ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील रुग्णालयात ऑक्सिजनची अपूर्ती आहे. त्यासोबतच अनेक विभागातील खाजगी रुग्णालय आणि मुंब्रा कौसा येथील रुग्णालयात ऑक्सिजनची गरज भासत आहे. काही ऑक्सिजन उत्पादन कंपन्या ऑक्सिजन देण्यास नकार देत आहे.


            यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने समन्वय समिती बनवून  संपर्क ठेवणे गरजेचे आहे. जर ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यास अशी परिस्थिती ओढवल्यास आपल्याला स्मशान आणि कब्रस्तान अपुरी पडतील. म्हणून पालिका प्रशासनाने तत्पर राहून ऑक्सिजनचा पुरवठा करावा अन्यथा गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल.     

विरोधी पक्षनेते शानू पठाण सकाळी ६-३० पोहचले नवी मुंबईत ऑक्सिजन कंपनीत विरोधी पक्षनेते शानू पठाण सकाळी ६-३० पोहचले नवी मुंबईत ऑक्सिजन कंपनीत Reviewed by News1 Marathi on April 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads