Header AD

‘मंदिरात कोणाला प्रवेश द्यावा’, हे ठरवण्याचा अधिकार मंदिर व्यवस्थापनाला

 

■अधिवक्ता विष्णु जैनसर्वोच्च न्यायालत अहिंदू आणि अश्रद्ध यांना मंदिर प्रवेश बंदी करा’ या विषयावरविशेष परिसंवाद’ संपन्न...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील डासना देवी मंदिराबाहेर मुसलमानांना मंदिरात प्रवेश वर्जित’ असल्याचा फलक लावल्यावरुन देशभरात मुसलमानतथाकथित पुरोगामी आणि काही प्रसिद्धीमाध्यमे यांनी विरोध केला. परंतु भारतीय राज्यघटनेतील कलम 26 (ब) आणि (ड)’ नुसार मंदिरात कोणाला प्रवेश द्यावा’ अथवा कोणाला प्रवेश देऊ नये’ हे ठरवण्याचा अधिकार मंदिर व्यवस्थापनाला आहे. 


                त्यामुळे कोणी अहिंदू वा श्रद्धाहीन व्यक्ती मंदिराचे नियम डावलून मंदिरात प्रवेश करुन धार्मिक भावना दुखावत असेलतर त्याच्या विरोधात हिंदूंनी धार्मिक भावना दुखावल्या म्हणून भा.दं.वि.च्या कलम 295 (अ) नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायला हवाअसे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता तथा हिंदु फ्रंट फॉर जस्टीसचे प्रवक्ता विष्णु शंकर जैन यांनी मांडले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित अहिंदू आणि अश्रद्ध यांचा मंदिरातील यांना प्रवेश बंदी करा’ या ऑनलाईन विशेष परिसंवादात ते बोलत होते.


         या संदर्भात डासना देवी मंदिराच्या महंत यति मां चेतनानंद सरस्वती म्हणाल्या कीडासना शिवशक्तीधाम येथे आसिफ नामक युवकाला मंदिरातील पाणी पिण्यावरून हिंदूंनी मारहाण केल्याचे खोटे चित्र साम्यवाद्यांनी उभे केले. वास्तविक धर्मांध आसिफ मंदिराच्या आवारात शिरून शिवलिंगांवर मूत्रविसर्जन कर असल्याचे आढळून आले होते. हे मंदिर मुसलमानबहुल प्रांतात असून मंदिरात चोरीदेवतांच्या मूर्तींची तोडफोडमंदिरात येणार्‍या हिंदू तरुणींची छेडछाड या घटना नित्याच्या झाल्या आहेत. या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही पोलिसांनी यासंदर्भात कारवाई केलेली नाही. त्यामुळे हिंदूंच्या रक्षणासाठी अहिंदूंना मंदिरात प्रवेशबंदी करण्याचा फलक लावावा लागला.


अहिंदूंना प्रवेश नाहीअसे फलक केवळ डासना देवी मंदिरात नव्हेतर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रवेशद्वारावरतसेच नेपाळमध्येही लावण्यात आलेले आहेत. भारतातील जी मंदिरे असे फलक लावण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ असतीलत्यांनासुदर्शन टी.व्ही.कडून आर्थिक आणि कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून दिले जाईल असे सुदर्शन टी.व्ही.चे व्यवस्थापकीय संचालक सुरेश चव्हाणके यांनी सांगितले.


श्रीराम सेनेचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष गंगाधर कुलकर्णी म्हणाले कीकर्नाटकातील श्री कोरगज्जा मंदिरातील दानपेटीत धर्मांधांकडून आपत्तीजनक वस्तू टाकून तेथील पावित्र्य भंग करण्याची संतापजनक घटना उजेडात आली असलीतरी ही एकमेव घटना नसून कर्नाटकात गेल्या 10 वर्षांत 60 ते 70मंदिरांत मूर्ती तस्करी आणि दानपेटीतील चोरीच्या सर्व घटनांमध्ये मुसलमान गुन्हेगारच सापडले आहेत.


                  तर 
मंदिरात साक्षात् भगवंत आहेअशी श्रद्धा ठेवून प्रवेश करणार्‍यालाच भगवंताचे आशीर्वाद मिळतात.  मंदिराचे पावित्र्य भंग करणार्‍यांना मंदिर प्रवेश वर्जित करण्याचा मंदिरांचा निर्णय योग्यच असल्याचे मत सनातन संस्थेच्या प्रवक्त्या अधिवक्ता कृतिका खत्री यांनी व्यक्त केले. 

‘मंदिरात कोणाला प्रवेश द्यावा’, हे ठरवण्याचा अधिकार मंदिर व्यवस्थापनाला ‘मंदिरात कोणाला प्रवेश द्यावा’, हे ठरवण्याचा अधिकार मंदिर व्यवस्थापनाला Reviewed by News1 Marathi on April 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads